पिंपरी : बेवारस वाहनांवर महापालिकेकडून कारवाई ऑ Unattended vehicles | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unattended vehicles

पिंपरी : बेवारस वाहनांवर महापालिकेकडून कारवाई

पिंपरी : शहरातील रस्ते, पदपथांवर, उड्डाणपुलाखालील अथवा इतर ठिकाणी बंद अवस्थेतील, बेवारस, नादुरुस्त वाहने, त्यांचे सांगाडे पडून आहेत. ते हटविण्यासाठी सात दिवसांची मुदत वाहन मालकांना दिली जाणार आहे. अशी वाहने दिलेल्या मुदतीत वाहनमालकांनी न हटविल्यास महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाकडील अतिक्रमण पथकांकडून ती उचलण्याची कार्यवाही केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिला.

केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेची घोषणा केली आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस प्रथम क्रमांकाचे अथवा स्टार मानांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी शहर स्वच्छ व सुंदर राखणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर, उड्डाणपुलाखाली व इतरत्र बरीच बेवारस वाहने पडून आहेत. त्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता दिसून येते.

हेही वाचा: शिक्षण विभागाला उपसभापतींचा घरचा आहेर; कामकाजावर जोरदार ताशेरे

त्यामुळे अशी वाहने क्षेत्रिय कार्यालयाकडील अतिक्रमण विभागामार्फत उचलणे व त्याबाबतची सर्व कार्यवाही करण्यात येणार आहे. महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने एका खाजगी संस्थेसमवेत करारनामा करुन बेवारस वाहने उचलण्याकामी हायड्रोलिक क्रेन व ट्रक्स इत्यादी यंत्रणा पुरविण्याबाबत कामाचे आदेश दिलेले आहेत. त्याचा क्षेत्रिय कार्यालयाला कारवाईसाठी उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा वाहनांचे छायाचित्रे काढून व चित्रीकरण करुन वाहनांचा सर्व तपशिलांची नोंद ठेवली जाणार आहे. अतिक्रमण पथकाने उचललेली वाहने मोशी येथील वाहनतळासाठी आरक्षित भूखंडावर ठेवली जाणार आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top