Nashik News Injured leopard dies in Sinnar area esakal
पुणे

Pune Leopard News : बिबट्याच्या दहशतीमुळे धास्तावला शेतकरी तर वनविभाग सुस्तावला !

नवनाथ भेके

Pune Leopard News : निरगुडसर जवळील वखारवाडी येथील शेतकरी पोपट सयाजी बाणखेले या शेतकऱ्याच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवार (ता.१८)रोजी मध्यरात्री घडली.

परिसरात गेल्या दीड महिन्यात ही तिसरी कालवड बिबट्याने ठार केली असून वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करून देखील पिंजरा लावण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी धास्तावला असून वनविभाग मात्र सुस्तावल्याचे चित्र दिसत आहे.

आंबेगाव तालुक्यातील भराडी गावानजीक वखारवाडी आहे. या भागात उसक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.सोमवार (ता.१८)रोजी मध्यरात्री पोपट बाणखेले यांचा नऊ महिन्याचा कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले ही घटना मंगळवार (ता.१९) रोजी सकाळी उघडकीस आली.

घटनेची माहिती पोलिस पाटील संतोष खिलारी यांनी वनविभागाला दिली.याअगोदर याच परिसरातील अजित बाळु गावडे व रामदास बजाबा बांगर या शेतकऱ्यांच्या दोन कालवडींवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले आहे,गेल्या दीड महिन्यात ही तिसरी घटना घडली आहे.संबधित शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वारंवार पिंजरा लावण्याची मागणी केली असून देखील वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

या परिसरात बिबट्याच्या डरकाळ्या वाढल्या असून दिवसाही बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे,यामुळे शेतीकामे करण्यास शेतकरी शेतात जाण्यास धास्तावस आहे तरी वनविभागाने तातडीने या भागात पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी पोपट बाणखेले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT