Leo Horoscope : सिंह राशीच्या लोकांनी 'या' राशीचाच जोडीदार निवडावा; नाहीतर...

सिंह ही राशीचक्रातील पाचवी रास. जंगलाचा राजा सिंह हे राशीचे प्रतीक आहे. या सिंह राशीवर रवी स्वामी असतो.
Leo Horoscope News
Leo Horoscope Newssakal

सौ. कानन माधव काकरे

( ज्योतिष तज्ज्ञ आणि टॅरोट कार्ड रीडर)

Singh Rashi : सिंह ही राशीचक्रातील पाचवी रास. जंगलाचा राजा सिंह हे राशीचे प्रतीक आहे. या सिंह राशीवर रवी स्वामी असतो. सूर्य सर्व ग्रहांना ऊर्जा देतो बळ देतो. तो या ग्रहांचा स्वामी आणि राजा आहे. ही अग्नी तत्वाची अल्पप्रसव रास आहे.

प्रचंड आत्मविश्वास भरपूर शक्ती त्याचप्रमाणे स्वतंत्र वृत्ती स्वाभिमान शौर्य या गोष्टी यांच्याकडे असतात. निसर्गतः हुकुम गाजवणारे नेतृत्व रागीटमानी निष्कपट स्तुती प्रिय महत्त्वाकांक्षी असतात. (Leo Horoscope News)

सिंह राशीच्या व्यक्तींची अंगकाठी उंच दीपमाळ दुहेरी हाड, छाती-खांदे रुंद, बांदेश्वर आकर्षक नजर, चपळ अशी असते. हे मोकळ्या मनाचे आणि आदर्श स्वभावाचे असतात. ही अग्नी तत्वाची राशी असून क्षत्रिय स्थिर राशी आहे.

शरीरातील पाठ आणि हृदय या ठिकाणांवर या राशीचे अंमल असते. तेजस्वी पण आकर्षकता महत्त्वकांक्षी भव्यता चमकदारता हे यांचे वैशिष्ट्य आहे. हे करारी असतात, धाडसी असतात. त्यांना स्वतःबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल आई-वडिलांबद्दल अभिमानी असतात.

Leo Horoscope News
Chandrakant Patil Astrology: जुननंतर चंद्रकांत पाटलांचं नशीब पालटणार; मिळणार मोठी जबाबदारी, ज्योतिषी म्हणाले…

ह्या व्यक्ती उदार परोपकारी असतात. स्वतः जवळचे मुक्तपणाने वाटणे यांचे वैशिष्ट्य असते. एखाद्या व्यक्तीवर त्यांच्या कामावर खुश झाल्यावर जसे मोठे लोक आनंदी होऊन बक्ष से महाल करतात. अशी ही राजाची रास आहे त्यामुळे कंजूसपणा, संकुचितपणा, कमीपणा या गोष्टी त्यांच्याकडून चुकूनही सापडत नाही.

या राशींच्या व्यक्तीकडे अधिकार, नेतेपदाची मनस्वी आवड, हुकूमशाही वृत्ती, दुर्दम्य आशावाद असतो. त्यांच्यामध्ये धडाडी धमक धाडस हे असते. हे मनाने निरोगी वृत्तीने चिरून खेळाडू असतात. ते मुळातच नशीबवान असतात.

Leo Horoscope News
Aditya Thackeray Astrology : आदित्य ठाकरेंचं 'या' वर्षी लग्न होणार? ज्योतिषी काय म्हणाले, वाचा

यांच्याकडे वारंवार संध्या आपोआपच येत असतात अनेक वरिष्ठांचा मोठमोठ्या उच्चपदस्थ नेतेमंडळींचा वरदहस्त यांना लाभत असतो. राजकीय आणि सामाजिक सार्वजनिक क्षेत्रात पुढारीपण, नेतृत्व यांना चालून येत असतो.

यांच्या मनात कोणाबद्दल कपट नसते यांच्या बोलण्यात चालण्यात वागण्यात एक ऐट रुबाबदारपणा असतो. आयुष्याच्या सुरुवातीला जर हे कनिष्ठ पदावर असते तर पुढे जाऊन यांना वरिष्ठ पद एक ना एक दिवस नक्कीच मिळते.

Leo Horoscope News
Sharad Pawar Astrology : शरद पवार 'या' वर्षी सत्तापालट करणार? ज्योतिषी म्हणाले...

सिंह राशीच्या व्यक्तीने जोडीदार निवडताना अथवा व्यापारी भागीदार निवडताना तूळ, धनु, कुंभ, मेष, वृषभ आणि मिथुन या राशींच्या व्यक्तींचा विचार नक्कीच करावा. तो फायदेशीर ठरेल. कारण सिंह राशींच्या व्यक्तींना आपला जोडीदार किंवा व्यवसायातील भागीदार हा प्रेमळ समजून घेणारा आपली वाहवा करणारा आपल्या मागेही आपल्या सगळ्या गोष्टी नियोजन बद्ध पद्धतीने मार्गी नेणारा हवा असतो.

तूळ राशी मध्ये नीटनेटकेपणा आदरभाव असतो तर धनु राशि मध्ये योग्य मार्गदर्शन असते कुंभ राशीमध्ये वैचारिक पूर्व निर्णय घेण्याची क्षमता असते. मेष राशी मध्ये धडाडी आपल्या जोडीदारासाठी किंवा मालकासाठी किंवा पार्टनर साठी आदरभाव असतो.

Leo Horoscope News
Uddhav Thackeray Astrology : उद्धव ठाकरेंच्या हातून 2023 मध्ये जाणार मुंबई महापालिका?

सिंह राशीचे लोक सरकारी अधिकारी , मोठे व्यापारी, कार्यकर्ते, पुढारी, वैद्य, सोनार कलाकार यामध्ये नाव कमवतात. ही रास बिघडल्यास यांना भरपूर शत्रूही असतात. कारण या व्यक्तींना अपमान सहन होत नाही.

या राशीनां हृदय हृदयासंबंधी आजार, पाठीसंबंधी आजार, कृष्टरोग, नेत्रदोष इत्यादी आजार असू शकतात. या राशीचा मंत्र : || ॐ सू सूर्याय नमः|| आहे.

वरील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com