Mokka crime
Mokka crime Sakal
पुणे

Mcoca Crime : हडपसरमधील अदनान शेख टोळीतील दहाजणांवर मोका

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हडपसर परिसरातील अदनान आबिद शेख याच्यासह टोळीतील दहाजणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार आत्तापर्यंत ५९ टोळ्यांवर कारवाई केली आहे.

अदनान शेख आणि त्याच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून आजीम शेख या तरुणावर तलवारीने वार करून खून केला. तसेच, अन्य दोघांवर वार करून गंभीर जखमी केले होते. आरोपींनी गुलाम अलीनगर परिसरात दहशत निर्माण केली होती. १७ ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला. याबाबत आजीमच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरून वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्यात टोळीप्रमुख अदनान आबिद शेख (वय २५, रा. सय्यदनगर, हडपसर), सादिक अब्दुल करीम शेख (वय ५६), अनिस सादिक शेख (वय ३२, रा. गुलाम अलीनगर, हडपसर), शाकीर कादर सय्यद (वय ३०), मोहसीन जावेद शेख (वय २४) आणि शहाबाज कादीर शेख (वय २८, रा. सय्यदनगर, हडपसर) या सहा जणांना अटक केली.

तर जाकीर कादर सय्यद (वय ४५), अमीर आकील सय्यद (वय २०), सिकंदर अयुब शेख (वय ३५) आणि अकबर अफजल हुसेन शेख (वय ४३, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) हे चौघे पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अदनान याने संघटित टोळी तयार करून परिसरात दहशत निर्माण करून गुन्हे केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी टोळीवर मोकांतर्गत कारवाई करण्याबाबत पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत प्रस्ताव पाठविला होता. त्यास अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT