Pune Metro Esakal
पुणे

Pune Metro: पुणेकरांनो आजपासून ४ दिवस बाणेर रस्ता वाहतुकीसाठी बंद; वापरा हे पर्यायी मार्ग

मेट्रो कामामुळे बाणेर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणेकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे. आजपासून हॉटेल ग्रीन पार्क चौक ते पल्लोड फार्म रस्त्यावर मेट्रोचं काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील बाणेर रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत हे बदल असणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलं आहे.

आजपासून बाणेर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू होणार असल्याने हॉटेल ग्रीन पार्क चौक ते महाबळेश्वर हॉटेलकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. दरम्यान कामामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद केली जाणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं सांगण्यात आलं आहे.

पर्यायी मार्ग?

- पुणे विद्यापीठ चौकाकडून अभिमान श्री जंक्शन येथून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी बाणेर फाटा चौकामधून उजवीकडे वळावे. ‘आयटीआय’ रस्त्यावरून परिहार चौक, डावीकडे वळण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे, नागरस रस्त्यावरून महाबळेश्वर हॉटेलजवळ बाणेर रस्त्यावर जावे.

- ग्रीन पार्क हॉटेल चौकामधून डावीकडे वळण घेऊन सोमेश्वर मंदिरमार्गे राम नदीवरील पुलानंतर उजवीकडे वळण घेऊन पासपोर्ट कार्यालयासमोरून वाहनचालकांना बाणेर रस्त्यावर जाता येईल. दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे पीएमपी ५ मार्गांवरील बसचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत.

-बस बाणेरकडे जाताना बाणेरफाटा चौकातून उजवीकडे वळून सर्जा हॉटेल, औंध आयटीआय, परिहार चौकातून पुढे डावीकडे वळण घेऊन डीपी रस्त्याने आंबेडकर चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मिडी पॉइंट हॉस्पिटलपासून डावीकडे वळण घेऊन लिंक रस्त्याने ताम्हाणे चौकातून डावीकडे वळण घेऊन कपिल मल्हार चौकातून बाणेर बस थांब्यावर येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT