Pune Traffic : ट्राफिकमुळे पुणे चर्चेत! पुणेकरांनी 'या' चौकाला दिले सगळ्यांत कमी रेटिंग अन् रिव्यूव्ह

"तुमच्या परिसरातला सर्वांत जास्त ट्राफिक असणारा चौक कोणता?"
Pune Traffic
Pune TrafficSakal

पुणे : पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तर कोरोनानंतर पुण्यात वाहतूक कोंडी वाढल्याचं अनेकांचे म्हणणे आहे. सध्या पुणे शहरातील एक चौक ट्राफिकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

"बाराही महिने वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजलेले असतात असे तुमच्या पाहण्यातील पुण्याचे ठिकाण कोणते?" असा प्रश्न प्रशांत धुमाळ यांनी ट्वीटरवर केला. त्यानंतर "कोंढवा चौकात सर्वांत जास्त ट्राफिक असते" असा रिप्लाय अनेक नेटकऱ्यांकडून करण्यात आला आहे. या चौकाला पुणेकरांनी सर्वांत कमी रेटींग आणि वाईट रिव्यूव्ह दिले आहेत.

त्यामुळे कोंढवा चौक सध्या चांगलाच चर्चेत आहेत. त्याचबरोबर पुणे आणि पुण्याच्या ट्राफिकविषयीची ही पोस्ट ट्वीटरवर चांगलीच व्हायरल होत आहे. कोंढवा चौकाबरोबर बऱ्याच चौकात वाहतूक कोंडी असल्याची तक्रार नेटकऱ्यांनी केली आहे.

Pune Traffic
Hingoli : ट्रॅव्हल बसवर दगडफेक; मात्र सुदैवाने बस मधील तीस ते चाळीस प्रवासी सुखरूप

वाहतूक विभागाकडून कारवाई

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यावर वाहतूक विभागातील पोलिस कडक कारवाई करत असतात. तर वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जाते. अवैध पार्किंग, विरूद्ध दिशेने वाहने घुसवणे, फुटपाथवरून गाड्या चालवणाऱ्यांविरूद्ध वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येते.

अनेक भागात वाहतूक कोंडीचा मनस्ताप

फक्त कोंढवा चौकातच नाही तर पुण्यातील अनेक भागात वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. नगर रोड, सोलापूर रोड, बाणेर रोड, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, नवले पूल, नवले पूल ते कात्रज चौक, हिंजवडी, कोंढवा, वाघोली, हडपसर, मुंढवा, पाषाण-सुस, खराडी, विद्यापीठ चौक, कर्वे रस्ता अशा भागांत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com