Supriya Sule
Supriya Sule sakal
पुणे

Pune : उद्या खासदार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर दौरा...

राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे उद्या शुक्रवार (ता.२१) रोजी एक दिवस इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती असून सुळे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील ७२ कोटी ३३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार असून दौऱ्यामध्ये ‘ माझा मतदार संघ,माझा अभिमान ’ या अभियानातंर्गत राज्यस्तरीय गुणवंत खेळाडूंशी संवाद साधणार आहेत.

इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे,विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या माध्यमातून माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे प्रयत्न सुरु आहेत.त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. उद्या शुक्रवारी (ता.२१) रोजी विविध विकासकामांचे उद्घघाटन करणार असून यामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना -उदमाईवाडी-घोलपवाडी-उद्घट - पवारवाडी या रस्त्याच्या कामसाठी ११ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. बंबाडवाडी-चव्हाणवाडी-परीटवाडी ते फडतरे नॉलेज सिटी कळंब या रस्त्याच्या कामासाठी ८ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शेळगाव बसस्थानक -शिरसटवाडी ते निमसाखर रस्ता करण्यासाठी १२ कोटी ३५ लाख,शिरसटवाडी जलजीवन मशिनतंर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी १ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.तसेच माळवाडी-ठाकरवाडी-पेटकरवस्ती-चिंदादेवी -अजोती-सुगाव-पडस्थळ रस्त्यासाठी १८ कोटी रुपयांची निधी मंजूर आहे. अजोती-सुगाव जलजीवन पाणीपुरवठा योजना व इतर विकास कामांसाठी ३ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. सणसर ३९ फाटा ते काझड रस्ता करण्यासाठी १५ कोटी ,जाचकवस्ती जलजीवन मशिनतंर्गत नळपाणी पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ३३ लाख रुपये मंजूर असून या विकासकामांचे खासदार सुप्रिया सुळे

यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे असून जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरसह तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता भवानीनगर पासुन खासदार सुळे यांच्या दौऱ्याला सुरवात होणार असून दुपारी २ वाजता उद्घट मध्ये माझा मतदार संघ,माझा अभिमान या अभियानातंर्गत ही राज्यस्तरीय गुणवंत खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५ वाजता अजोती येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन झाल्यानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Nashik Crime News : जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक! मंदिर परिसरात सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या

Government Employees Retirement : निवृत्तीचं वय अन् महागाई भत्ता, दोन्ही वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?

SCROLL FOR NEXT