katraj  sakal
पुणे

Pune News : सुखसागरनरमध्ये ड्रेनेजच्या समस्येने नागरिक त्रस्त

सातत्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर; कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडून ठोस उपाययोजना नाही

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील सुखसागरनगर-राजीवगांधीनगर रस्त्यावर ड्रेनेजच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचत असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून सातत्याने उद्भवणाऱ्या ड्रेनेजच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. चेंबर तुंबल्याने मैलायुक्त पाणी रस्त्याने वाहत असून मागील महिनाभरापासून पाठपुवारावा करुनही कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसून सातत्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

या ड्रेनेजच्या पाण्यामुळे सकाळच्यावेळी नागरिकांना रस्त्याने चालता येत नाही. दुर्गंधीसह डास माशांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीच्या रोगांना निमंत्रण मिळते. या भागात चेंबर तुंबण्याच्या घटना गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार होत आहेत. क्षेत्रीय कार्यालय ड्रेनेज विभागाकडून तात्पुरती दुरुस्ती केली जाते, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. अशा घटनांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

एकवेळेस याठिकाणी काम केले असून ते निकृष्ट दर्जाचे आहे. निकृष्ट दर्जाचे काम करायचे असेल कर कशासाठी करायचे हा प्रश्न आहे. मागील महिनांभरापासून ड्रेनेजचे पाणी साचत असल्याची तक्रार मी अधिकाऱ्यांकडे करत आहे. मात्र, त्याला चुकीच्या पद्धतीने प्रतिसाद देण्यात येत आहे.

नरेंद्र शिंदेकर, स्थानिक नागरिक

संबंधित काम आम्ही हाती घेतलेले आहे. परंतु, पाणी वाहून नेणाऱ्या पाईपची रुंदी असमान झाल्याने हा प्रश्न उद्भवला होता. पुढील दोन ते तीन दिवसांत याठिकाणी होत असलेली अडचण दुर करून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

नरेश शिंगटे, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT