Pune Crime : मंचर शहरात उत्तमभाग्य सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा; 5 दरोडेखोर ताब्यात, 2 फरार

दोनजण फरारी; साडेसहा लाख रुपयांचा ऐवज जप्त
robbery at uttam bhagya gold and silver shop in Manchar 5 robbers arrested 2 absconding 6 lakh rupees seized
robbery at uttam bhagya gold and silver shop in Manchar 5 robbers arrested 2 absconding 6 lakh rupees seizedSakal

मंचर : मंचर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या उत्तमभाग्य सोन्या-चांदीच्या दुकानात बुधवारी (ता.८) पहाटे तिसऱ्या मजल्यावरील छतावरून सशस्त्र सात दरोडेखोरांनी प्रवेश केला. सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरटे घेऊन चालले होते.

पण यश समदडीया (वय २१) व जैना समदडीया (वय १७) ह्या भावंडानी धाडस दाखवून चोरट्यांना प्रतिकार करून आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक व मंचर पोलीस ताबडतोब मदतीसाठी घटनास्थळी आले. पळून जाणाऱ्या पाच दरोडेखोरांना रंगेहात पकडण्यात यश आले आहे. दोनजण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. त्यांचा शोध मंचर पोलीस घेत आहेत.

मंचर येथील अभिजित समदडीया यांच्या मालकीचे उत्तमभाग्य सोन्या-चांदीचे दुकान आहे. पोलिसांनी व समदडीया यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटे ड्रेनेजच्या पाईपवर चढून तिसऱ्या मजल्याच्या छतावर आले. तेथील दरवाजा तोडून चोरटे थेट तळातील दुकानात गेले. तेथे सीसीटीव्ही कँमेरे बाजूला फिरविले.

सायरनच्या वाहिन्या तोडून टाकल्या. १८ किलो ७०० ग्रँम चांदीचे दागिने, पाच तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज त्यांनी घेतला. जिन्याने ते पहिल्या मजल्यावरून जात होते. त्यांच्या आवाजाने खोलीमध्ये झोपलेले अभिजित यांचे चिरंजीव यश यांना जाग आली. त्यांनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले. लगेचच सहा चोरटे हातात कोयते घेऊन खोलीत आले.

या आवाजाने जागी झालेल्या जैनाने एका चोरट्याला लाथ मारली. दोन-तीन चोरट्यांनी तीच्या तोंडाला रुमाल बांधला. त्यावेळी तिने चोरट्यांना चावाही घेतला. यावेळी प्रतिकार करणाऱ्या यशला ही जखमी केले आहे.

या दोन भावंडाना त्यांच्या वृद्ध आजी ललिता (वय ७२) यांच्या खोलीत नेऊन डांबून ठेवले. कोयत्याचा धाक दाखवून ‘तिजोरीच्या चाव्या कुठे आहेत.’ अशी विचारणा आजीला केली. त्या म्हणाल्या ‘मी बाहेरगावी होते, आजच आले आहे. मला माहित नाही.’

दरम्यान झालेला आरडाओरडा ऐकून दुसऱ्या मजल्यावरील खोलीतील अभिजित यांना जाग आली. त्यांनी ताबाडोब मोबाईलमधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावेळी त्यांना दोन्ही मुले खोलीत नसल्याचे आढळून आले. त्यांना संशय आला. त्यांनी ताबडतोब मोबाईलद्वारे महावीर संचेती, गिरीश समदडीया,निरज समदडीया यांच्याशी संपर्क केला.

संचेती यांनी मंचर पोलिसांना माहिती कळविली. पाचच मिनिटात गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर शेटे, पोलीस हवालदार गणेश डावखर, तान्हाजी हगवणे, नंदकुमार आढारी, शरद फुलवडे, होमगार्ड अर्जुन ठोंबरे, फैजल खान घटनास्थळी आले.

पोलीस व नागरिक जमा झाल्याची चाहूल लागताच चोरटे छतावर गेले. पोलीस व नागरिकांनी दोन्ही इमारतींना वेढा घातला होता. नागरिकांनी व पोलिसांनी छतावर जाऊन पाच चोरट्यांना पकडले. दोनजण पळून गेले आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे : वैभव बाळू रोकडे (वय २४ रा. नागाचा खडा ता.मुरमाड जि.ठाणे), गणेश रामचंद्र टोके (वय २६ रा,.नडे ता.मुरमाड जि.ठाणे), अजय घिसे (वय २३ चालक, रा. कलगाव ता.शहापूर जि.ठाणे), ग्यानसिंग वर्मा (वय २३ रा. घोडबंदर रस्ता ठाणे मूळ गाव गायत्रीनगर बांधा उत्तरप्रदेश), मोहम्मद दर्जी (वय २३ नेहरू चाळ कुर्ला पूर्व मुंबई मूळ रा. सुलतानपूर उत्तरप्रदेश),

“सहा लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून जप्त करण्यात यश आले आहे. दोन चोरटे मंचर शहर परिसरातच राहणारे आहेत.त्यांनी गेली काही दिवस पाळत ठेऊन सदर प्रकार केला आहे. मुंबई, मुरमाड व उत्तर प्रदेश भागातील सराईत चोरटे आहेत.अजून त्यांनी यापूर्वी कुठे चोऱ्या केल्या होत्या.

तसेच स्थानिक अजून कोण गुन्हेगार त्यांच्या संपर्कात आहेत. याबाबतचा सखोल तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गटटे यांनी मंचर पोलीस पथकाचे व नागरिकांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. ”

सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग

चोरट्यांचा छतावर प्रवेश : पहाटे २.१५ मिनिटांनी

दुकानात प्रवेश : २.३० मिनिटांनी

पहिल्या मजल्यावरील खोलीत प्रवेश :३. १० मिनिटांनी

अभिजित समदडीया यांनी सीसीटीव्ही तपासले. ३.२० मिनिटांनी

अभिजित यांचा चार जणांशी संपर्क- ३.२२ मिनिटांनी

पोलिसांना घटनेची माहिती महावीर संचेती यांनी दिली ३.२३ मिनिटांनी

पोलीस पथक व नागरिक हजर.३.२८ मिनिटांनी

छतावर जाऊन पोलिसानी चोरट्यांना पकडले. ३.४५ मिनिटांनी

जप्त केलेल्या वस्तू : कोयते, गँस कटर, पिस्तुल, कटावणी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com