kataraj  sakal;
पुणे

Pune News : कात्रज दूध संघाला ५१ लाखांचा नफा

२२-२३ मध्ये संघाकडून प्रतिदिन सरासरी २.०४ लाख लिटर दूध संकलन; ८० कोटी रुपयांची एकूण विक्री

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज डेअरीला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. या वर्षात गायीच्या दूधाचा सरासरी खरेदी दर ३५ रुपये ०६ पैसे आणि म्हैस दूधाचा सरासरी खरेदी दर ४९ रुपये ५७ पैसे देण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्ष २१-२२ पेक्षा हा दर ९ रुपयांनी जास्त आहे. तसेच, संघाने प्रतिदिन सरासरी २.०४ लाख लिटर दूध संकलन केले आहे.

संघाने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री वाढविण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच ग्रामीण भागासह पेण, पनवेल, नवी मुंबई, वसई तसेच सिन्नर, नाशिक याठिकाणी नवीन मिल्क पार्लर्स सुरु केली आहेत. तसेच, पुणे-सोलापुर-अक्कलकोट, पुणे-सातारा महाबळेश्वर आणि नगर-सुपा, बारामती हे दूधवितरण मार्ग चालू केले आहेत.

सातारा, सांगली, कोल्हापुर या ठिकाणी वितरक नेमणुक केली आहे. येरवडा जेल, ससुन हॉस्पिटल आदी शासकिय आस्थापनांना दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा सुरु केला आहे. तसेच, नव्याने एकूण १३४ आधुनिक पद्धतीचे मिल्क व आईस्क्रीम पार्लर सुरु केली आहेत. या सर्वांच्या जोरावर संघाने या वर्षात तब्बल ८० कोटी रुपयांची विक्री केली आहे.

संघाच्या कोंढापुरी येथे उभारण्यात आलेल्या पशुखाद्य कारखान्याचे कामकाज पूर्ण झालेले असून पशुखाद्य विक्री सुरू करण्यात आली आहे. पशुखाद्य कारखान्यामध्ये तयार करण्यात येणाऱ्या पशुखाद्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी एनडीडीबीचे मानांकन असलेले क्वालिटी मार्क हे प्रमाणपत्र घेण्यात आले असून ८ कोटी रुपये पशुखाद्याची विक्री या वर्षात करण्यात आली आहे. संघाच्या अवसरी दूध शितकरण केंद्र येथे बायोगॅस व सेंद्रिय खत प्रकल्पही उभारण्यात आला आहे. तसेच, मिठाई उत्पादनासाठी दुग्धालयामध्ये वेगळा सेक्शन तयार करण्यात आला असून उत्पादित झालेला माल ठेवण्यासाठी नविन स्टोअर रूम बांधण्यात आले आहे.

संघाने या आर्थिक वर्षात खूप चांगली कामगिरी केली असून ओतूर दूध शितकरण येथे जनावरांच्या उपचारसाठी उपयुक्त असा ईथिनो व्हिटरनरी मेडिसीन प्रकल्प उभारणीचा आमचा मानस आहे. कात्रजची सर्वच उत्पादने दर्जेदार असल्याने त्यांना मागणी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे काही नविन आधुनिक मशिनरी घेण्यात आली आहे. तसेच, कात्रज मलई कुल्फी, मँगो कुल्फी, ड्रायफ्रुटस कुल्फी या तीन फ्लेवर्समध्ये आम्ही कात्रज कुल्फी बाजारात आणत आहोत. लवकरच कात्रज मस्तानी व कात्रज टेट्रा पॅक दूध घेऊन येण्याचा संघाचा मानस आहे.

भगवान पासलकर, अध्यक्ष, कात्रज डेअरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT