pune-railway-station pune-railway-station
पुणे

पुणे : प्लॅटफॉर्म तिकीट दर पुन्हा नॉर्मल; ५० रुपयांवरून १० रुपये

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म (Platform ticket) तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने मंगळवारपासून (१ फेब्रुवारी) पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये करण्यात आले आहे.

कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्यभरात निर्बंध देखील लागू केले होते. स्थानकावरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाच्या रकमेत वाढ केली होती. यासह केवळ वृद्ध, दिव्यांग, रुग्ण, गरोदर आदींसह मदतीची गरज असणाऱ्या व्यक्तींनाच प्लॅटफॉर्म तिकिटे देण्यात येत होते.

सध्याच्या कोविड स्थितीचा आढावा घेऊन पुणे (Pune) रेल्वे विभागाने पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकिटाच्या (Platform ticket) दरात बदल केला आहे. १ फेब्रुवारीपासून पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ५० ऐवजी १० रुपये आकारण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT