police  Sakal
पुणे

पुणे : 'कोम्बिंग ऑपरेशन'मध्ये सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

दोन हजार 787 जणांची चौकशी, गुन्हेगारांकडून पिस्तुल, काडतुसे व शस्त्रे जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर पोलिसांकडून एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा शहरातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या सराईत गुन्हेगारांच्या अचानक तपासणीसाठी "कोम्बिंग ऑपरेशन' राबविण्यात आले. त्यामध्ये पोलिसांनी दोन हजार 787 गुन्हेगारांची चौकशी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पोलिसांकडून या आठवड्यात सलग दुसऱ्यांदा "कोम्बिंग ऑपरेशन' मोहिम राबविण्यात आले. मंगळवारी रात्रीही मोहिम राबविण्यात आली होती, त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकांसह पोलिस ठाण्यांची पथके शनिवारी पहाटेपर्यंत या मोहिमेअंतर्गत गुन्हेगारांची चौकशी करीत होते.

पोलिसांनी दोन हजार 787 जणांची चौकशी केली. त्यामध्ये 722 गुन्हेगार हे त्यांच्या राहण्याच्या मुळ पत्त्यावर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल मारहाणीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी शशीकांत उर्फ चॉकलेट भोंडे (वय 22, रा. गंज पेठ) यास या माहिमेमध्ये अटक करण्यात आली, त्यास दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी, प्रवीण ऊर्फ सोन्या भीमा लोखंडे (वय 26, रा. निंबाळकर वाडी, कात्रज), बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी इइग्रान मनीर मंडल (वय 21, रा.बिबवेवाडी) यांनाही अटक करण्यात आली.

तर खंडणी विरोधी पथकाने आझम इक्‍बाल शेख (वय 22रा. भवानी पेठ) यास अटक करण्यात आली. पोलिसांनी 34 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच बेकायदा गावठी दारू प्रकरणी कारवाई करुन पोलिसांनी 199 लिटर दारू जप्त केली. दरम्यान, हडपसर भागात बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सूरज व्यंकट पोतदार (वय 32 , रा.त्रिवणी कॉलनी, हडपसर) यास अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. याबरोबरच कोयता, तलवार अशी शस्त्रे बाळगणाऱ्या सात जणांनाही पोलिसांनी अटक केली.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, डॉ.प्रियांका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहिदास पवार, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT