पुण्यात ९५ कोटी खर्च करून उभारणार सहकार संकुल

सहकार विभागाच्या अंतर्गत पुणे शहरातील २३ कार्यालये खासगी जागेत भाडेपट्टीवर कार्यरत आहेत.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

पुणे : सहकार विभागाची शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये एकाच छत्राखाली येणार असून, त्यासाठी सुमारे ९५ कोटी रुपये खर्च करून येरवडा येथे ‘सहकार संकुल’ उभारण्यात येणार आहे. सहकार विभागातील विविध कार्यालये एकाच ठिकाणी आल्यास कामकाजात समन्वय राखण्यासोबतच खर्चात मोठी बचत होणार आहे.

सहकार विभागाच्या अंतर्गत पुणे शहरातील २३ कार्यालये खासगी जागेत भाडेपट्टीवर कार्यरत आहेत. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, साखर संकुलासह अन्य खासगी ठिकाणी ही कार्यालये आहेत. त्यावर वार्षिक भाड्यापोटी मोठ्या प्रमाणावर सरकारी निधी खर्च होत आहे. शिवाय, नागरिकांना त्यांच्या कामासाठी या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

Pune Municipal Corporation
वनविभागाची जमीन बळकावणारा सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

त्यामुळे सहकार विभागाची शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालये एकाच छत्राखाली आणण्याचा प्रस्ताव सहकार आयुक्तालयाच्या विचाराधीन होता. त्यानुसार सहकार आयुक्त यांनी येरवडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर ‘सहकार संकुल’ इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सुमारे १०८ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय समितीने ९४ कोटी ५९ लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.

प्राधिकारी किंवा अभियंता यांची मान्यता आणि अर्थसंकल्पात तरतूद झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरवात होणार आहे. दिव्यांग व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Pune Municipal Corporation
UP Election: भाजपाला पाठवा 'सात समुंदर पार' : अखिलेश यादव

येरवडा परिसरात जीएसटी भवनाजवळ सहकार संकुलाची ही इमारत उभारण्यात येणार आहे. सहकार विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये समन्वयासाठी केंद्रीय भवन असणे सहकाराच्या दृष्टीने चांगली बाब आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रिया जलद गतीने होईल.

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com