Ajit pawar sakal
पुणे

Pune Accident Updates : अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण; म्हणाले, स्लॅब कोसळला तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा

पुणेः "आपल्या मतदारसंघात काही घडले तर आमदारांना तेथे जावेच लागते. आमदार सुनील टिंगरेंच्या मतदारसंघात पूर्वी बांधकाम स्लॅब कोसळला, तेव्हाही ते लोकप्रतिनिधी म्हणून तिथे गेले, त्यांनी लोकांची मदत केली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात त्यांनी पोलिसांवर दबाव आणला, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे आरोप बिनबुडाचे आहेत. तसे काही झालेले नाही.' असे सांगत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सुनील टिंगरे यांच्यावरील टीकेला उत्तर देत त्यांची पाठराखण केली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या पार्श्‍वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी टिंगरे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नाबाबत पवार म्हणाले, ""कल्याणीनगर येथील अपघातानंतर टिंगरे यांना कोणाचा फोन आला होता, हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केलेले आहे. ते पोलिस ठाण्यात आले, मात्र त्यांनी कोणालाही पाठीशी घातलेले नाही. टिंगरे यांची तब्येत बरी नसल्याने ते माध्यमांसमोर येऊ शकले नाहीत. माझे त्यांच्याशी बोलणे झाले असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची त्यांची तयारी आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री म्हणून पोलिसांना योग्य सूचना दिल्या आहेत.''

पवार म्हणाले, "या अपघात प्रकरणाची सरकार व पोलिसांकडून योग्य प्रकारे चौकशी सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने अल्पवयीन मुलाविरोधात आणखी कलमे लावण्यात आली आहेत. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या. अल्पवयीन मुलाला बाल न्यायमंडळाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाची देखील सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT