Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Sangli Exit Poll: लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आज समोर आले आहेत. अशातच सांगलीत धक्कादायक पोल समोर आला आहे. सांगलीतून एक्झिट पोलनुसार अपक्ष उमेदवार विशाल पाटील बाजी मारणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Sangli Exit Poll
Sangli Exit PollEsakal

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आज समोर आले आहेत. अशातच सांगलीत धक्कादायक पोल समोर आला आहे. सांगलीतून एक्झिट पोलनुसार अपक्ष उमेदवार विशाल पाटील बाजी मारणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि महायुतीचे संजयकाका पाटील यांना पराभव होणार असल्याचा अंदाज आहे.

महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं. काँग्रेसच्या विशाल पाटलांनी आधीपासून सुरूवात केली होती. त्या दरम्यान महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने परस्पर या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झाली होती. मात्र शिवसेना ठाकरे गट आपल्या निर्णयावर ठाम होते.

Sangli Exit Poll
Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशा तीन पाटलांमध्ये लढत झाली होती. त्यातील विशाल पाटील जागा जिंकतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला जात आहे.

विशाल पाटील हे जरी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढत असले तरी त्यांना काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मदत केल्याच्याही चर्चा आहेत. तर काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी विशाल पाटलांना मदत केल्याची उघड आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे त्या ठिकाणाहून विशाल पाटलांना मताधिक्य मिळाल्याची चर्चा आहे. येत्या 4 जून रोजी अंतिम निकाल समोर येणार आहे.

Sangli Exit Poll
Maharashtra Exit Poll : महाराष्ट्रात पुन्हा युती की महाविकास आघाडी? असे आहेत एक्झिट पोलचे अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com