रुपी’ साठी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरना साकडे  sakal
पुणे

पुणे : रुपी’ साठी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरना साकडे

केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा; प्रशासक सुधीर पंडित यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेली आठ वर्षे प्रलंबित असलेला रुपी बँकेचा प्रश्न त्वरित सोडवावा. तसेच, एखाद्या सक्षम बँकेत रुपीचे विलीनीकरण करून पाच लाखांपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या ठेवीदारांचे हित अबाधित राखावे, अशी विनंती रुपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर राजेश्वर राव आणि एम. पी. जैन यांच्याकडे केली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित यांनी रिझर्व्ह बँकेच्या मुंबईतील कार्यालयात दोन्ही डेप्युटी गव्हर्नर यांची भेट घेतली. रुपी बँकेच्या विलीनीकरणासाठी आणि पाच लाखांपेक्षा जास्त ठेवींचे रक्षण करण्याची विनंती केली. याबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी विशेष पुढाकार घेत रिझर्व्ह बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांचे रुपी बॅंकेच्या ठेवीदारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

प्रशासक पंडित यांनी या भेटीत बँकेने गेल्या पाच वर्षांत केलेली कर्ज वसुली, मिळवलेला परिचालनात्मक नफा, दोषी संचालक आणि अधिकारी यांच्याविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती दिली. ठेवीदारांना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार हार्डशिप योजनेंतर्गत केलेल्या ठेवींचा परतावा आणि विलीनीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत सांगितले. या प्रसंगी डॉ. कराड यांचे स्वीय सचिव सौरभ देशमुख उपस्थित होते.

रुपी बॅंकेच्या ठेवीदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु पाच लाखांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या ठेवीदारांचे ३७० कोटींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बॅंक अवसायनात जाण्याची भीती आहे, याकडे रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नर यांचे लक्ष वेधले. त्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. तसेच, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनीही स्वत:पाठपुरावा करतील, असे आश्वासन दिले आहे. ही भेट अतिशय आशादायी झाली.

- सुधीर पंडित, प्रशासक रुपी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT