esakal | Pune: भाजीमार्केटच्या नवीन कमानीच्या उदघाटनास मुहूर्त मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

भाजीमार्केटच्या नवीन कमानीच्या उदघाटनास मुहूर्त मिळेना

स्वारगेट : भाजीमार्केटच्या नवीन कमानीच्या उदघाटनास मुहूर्त मिळेना

sakal_logo
By
महेश जगताप

स्वारगेट : शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या लक्ष्मीबाई नारायणराव खेडेकर भाजीमार्केटला नवीन उभारलेल्या कमानीचे गेली सहा महिने झाले उदघाटन झाले नसल्याने स्थानिक नागरिक हवालदिल झाले आहेत. उदघाटन करण्यास राज्यकर्त्यांना नेमका मुहूर्त कधी मिळणार आहे असा सवाल नागरिकांना केला आहे .

लक्ष्मीबाई नारायणराव खेडेकर भाजीमार्केट मध्ये साधारण शंभरच्या आसपास किरकोळ भाजीविक्रते बसतात .गेल्या काही दिवसापासून अंतर्गत झालेली पडझड नीट करण्यासाठी कामे चालू आहेत .या भाजीमार्केट मध्ये घोरपडी पेठ ,पोलीस कॉलनी ,शुक्रवार पेठ ,शिवाजी रस्त्याच्या आजूबाजूला राहणारे नागरिक मुख्यतः भाजी खरेदीसाठी येथे येत असतात .

हेही वाचा: माझ्यासाठी काम करणाऱ्यांसाठी मी जीव तोडून काम करणार - डॉ. कोल्हे

सहा महिन्यांपूर्वीच या भाजी मार्केटच्या नावाचा जुना बोर्ड काढून नवीन कमान उभी केली आहे .परंतु गेली सहा महिने झाले त्यावर पडदे टाकून कमान झाकली आहे .त्यामुळे ह्या कमानीचे नेमके उदघाटन कधी करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे .

अंतर्गत पडझड झालेल्या भाजीमार्केटच काम चालू आहे .त्यामुळे कमानीचे उदघाटन करण्यास वेळ लागत आहे .एकदा अंतर्गत कामे झाली की लगेच उदघाटन करून घेतो

-अजय खेडेकर ( नगरसेवक )

गेली सहा महिने झाले काम होऊन तरी अजूनही राज्यकर्ते भाजी मार्केटच्या कमानीचे उदघाटन करण्याचे नाव घेत नाहीत ...लवकरात लवकर या कमानीचे उदघाटन करावे .

-आशिष साबळे पाटील ( स्थानिक नागरिक )

loading image
go to top