पुणे

पुणे ग्रामीण पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीविरुद्ध कसली कंबर

संघटीत गुन्हेगारीविरुद्ध ग्रामीण पोलिसांचा चाप

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा

संघटीत गुन्हेगारीविरुद्ध ग्रामीण पोलिसांचा चाप

पन्नासपेक्षा जास्त टोळ्या, २५० पेक्षा जास्त गुन्हेगार कारागृहात

पुणे : कधी भूखंडांची प्रकरणे, तर कधी औद्योगिक कंपन्यांकडून खंडणी वसुलीच प्रकार, त्याचबरोबर वाळू तस्करी आणि याच स्वरूपाचे गंभीर गुन्हे संघटीतपणे करण्याचा प्रकार काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यात सुरू होता. मात्र, मागील अडीच वर्षांत याविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी कंबर कसून ‘मोका’ साधला. एक-दोन नव्हे तर तब्बल ५० हून अधिक गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका), तडीपारी, स्थानबद्धता अशा पद्धतीची कारवाई करीत त्यांची थेट कारागृहात रवानगी केली.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून संघटित गुन्हेगारांविरुद्ध मागील काही महिन्यांपासून कारवाई केली जात आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांवर चांगलाच वचक बसला आहे. आता ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघटित गुन्हेगारी टोळ्यांना ग्रामीण पोलिसांनी चाप लावला आहे.

औद्योगिक वसाहतींना फायदा

शहरीकरण, औद्योगिकीकरण व पर्यटनामुळे ग्रामीण भागामध्ये जमिनीला आलेली किंमत, जमिनीवरील बेकायदा ताबेमारी, पिरंगुट, रांजणगावसह अन्य औद्योगिक वसाहतींमधील ठेकेदारी, त्यातून घडणारे खंडणीचे प्रकार, वाळु तस्करी, गुन्हेगारांमध्ये वर्चस्ववादातून होणारा संघर्ष, त्यातून होणारे खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात ग्रामीण पोलिस दलाला यश येऊ लागले आहे. पोलिसांच्या या कारवाईचा सर्वाधिक फायदा औद्योगिक वसाहती, कंपन्यांना होऊ लागला आहे.

पाच तालुक्‍यांत कारवाई

मुळशी, पौड, हवेली, बारामती व इंदापूर तालुक्‍यामध्ये काही वर्षांपासून संघटित गुन्हेगारीने डोके वर काढले होते. सर्वसामान्य नागरीकांना त्याचा फटका बसत होता. या प्रकाराची पोलिस अधिक्षक देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार अडीच वर्षांत ५० हून अधिक गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख व त्यांच्या २५० हून अधिक गुन्हेगारांची कारागृहात रवानगी केली आहे.

टॉप टेन फॉर्म्युला...

पोलिस अधिक्षक देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांना ‘टॉप टेन फॉर्म्युला’ राबविण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांच्या रेकॉर्डवरील १० सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली. संबंधित १० सराईत गुन्हेगारांची इत्थंभूत माहिती गोळा करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

''पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मालमत्तेचे व शरिराविरुद्धचे गंभीर गुन्हे सातत्याने घडत होते. त्यासंदर्भातील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईही सुरू होती. कायदेशीर प्रक्रियेनुसार प्रारंभी तडीपारी कारवाई, ‘एमपीआयडीए’अंतर्गत कारवाई केली जात होती. तरीही संबंधित गुन्हेगारांमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांच्याविरुद्ध ‘मोका’नुसार कारवाई केली.''

- अभिनव देशमुख,पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण पोलिस

पोलिसांनी टोळ्यांविरुद्ध केलेली कारवाई

वर्ष गुन्हे आरोपींची संख्या

२०१९ १५ १०४

२०२० १५ ७६

२०२१ १० ६१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT