पुण्यात आजपासून संचारबंदी लागू; असे असतील नवे निर्बंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुण्यात आजपासून संचारबंदी लागू; असे असतील नवे निर्बंध

पुणे - पुणे महापालिकेने काढलेल्या नव्या आदेशानुसार सोमवारपासून कडक निर्बंध लागू होणार आहेत. सर्व बाजारपेठ दुपारी चार वाजता बंद होईल, तर सायंकाळी पाच वाजल्यापासून संचारबंदी लागू होणार आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढल्याने राज्य सरकारने तिसऱ्या स्तरातील निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शहरात सोमवारपासून सुरू होत आहे.

असे आहेत नवे निर्बंध

- अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सकाळी सात ते दुपारी चार सुरू राहतील

- अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार उघडी राहतील

- शनिवारी व रविवारी ही दुकाने बंद असतील

- हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने व मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू असतील

- शनिवार व रविवारी हॉटेलमधील खाद्यपदार्थ, मद्य याची डोम डिलिव्हरी मिळेल

हेही वाचा: पुणे : 18 ते 44 गटासाठी ऑन स्पॉट लसीकरण बंद

- लोकल सेवा केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असेल

- सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, उद्याने, सायकलिंग पहाटे ५पाच ते सकाळी ९ पर्यंत खुली

- खासगी कार्यालये सोमवार ते शनिवार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के कर्मचारी क्षमता सुरू असतील

- आउटडोअर क्रीडांगणे सकाळी ५ ते ९ सुरू राहतील

- सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजन कार्यक्रमास सोमवार ते शुक्रवार ५० टक्के उपस्थिती मान्यता

- धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद असतील, केवळ दैनंदिन पूजेस परवानगी

- लग्न समारंभास ५० जण तर, अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीत मान्यता

- राहण्याची सोय आहे अशा बांधकाम प्रकल्पावर दुपारी ४ पर्यंत काम करण्याची मुभा

- शेती विषयक कामे आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ पर्यंत करता येतील.

हेही वाचा: जेईई ॲडव्हान्सची तारीख लवकरच होणार जाहिर

- जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने सुरू, एसी बंद ठेवावा लागणार

- सार्वजनिक वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार

- ई कॉमर्स नियमित वेळेत सुरू राहील

- माला वाहतूक नियमित वेळेत सुरू राहील

- आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची गरज नाही., मात्र, पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यात प्रवासासाठी ई- पास अनिवार्य

- अत्यावश्‍यक वस्तू उत्पादन कंपन्या, आयटी, डेटा सेंटर नियमित वेळेत सुरू राहातील

Web Title: Pune New Guidelines Curfew From 28 June Know

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top