Crime Sakal
पुणे

Pune Crime : पुण्यात स्कूलबसच्या ड्रायव्हरनेच केला विद्यार्थिनीवर बलात्कार

पीडित विद्यार्थिनीची आणि स्कूलूसच्या ड्रायव्हरची शाळेत ये-जा करताना ओळख निर्माण झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाने शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी बसचालकाला अटक केली. सोमेश्वर घुले पाटील (वय ३५, रा. वडाची वाडी, उंड्री) असे अटक केलेल्या बस चालकाचे नाव आहे. याप्रकरणी एका १५ वर्षीय मुलीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सोमेश्वर विद्यार्थी वाहतूक करतो. त्यामुळे त्याची संबंधित मुलीशी ओळख झाली होती. सोमेश्वरने तिला आमिष दाखविले मुलगी सज्ञान नसल्याचा गैरफायदा घेत चार दिवसांपूर्वी तिच्यावर बलात्कार केला.

(Pune Crime News)

मुलगी शाळेतून घरी उशिरा आली, त्यावेळी तिच्या आई - वडिलांनी तिची चौकशी केली. तेव्हा बसचालकाने तिला आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पीडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन सोमेश्वरला अटक केली. या प्रकरणाचा तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT