अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला | Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar CM Shinde Meeting

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) हे आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आदि नेते उपस्थित होते.

(Opposition Leader Ajit Pawar Meet CM Eknath Shinde)

नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नगर विकास विभागातील कामांना स्थगिती दिली आहे. २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या कामांना स्थगिती दिली असल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: CM शिंदेंचा अजित पवारांना दणका; ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती

दरम्यान, सत्तेत आल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी आणि अजित पवारांना चांगलाच दणका दिला असून त्यांनी नगरविकास विभागाच्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. यामध्ये बारामती नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला होता.

मुख्यमंत्री शिंदेंनी नगरविकास विभागाच्या मार्च ते जून २०२२ मध्ये मंजूर झालेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. यातही महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: PHOTOS: डॉन 'डॅडी'चा वाढदिवस दिमाखात साजरा; दगडी चाळीत उत्साह

सूडबुद्धीने निर्णय घेऊ नका आणि कामांना स्थगिती देऊ नका अशी विनंती यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Ajit Pawar And Other Ncp Leader Meet Cm Eknath Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..