सुवर्णयुग सहकारी बँक Sakal
पुणे

पुणे : सुवर्णयुग सहकारी बँकेचे नवीन संचालक मंडळ जाहीर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट अंतर्गत सुवर्णयुग सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट अंतर्गत सुवर्णयुग सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली. बँकेच्या २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली.

ट्रस्टचे विश्वस्त आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, बँकेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या पुढाकाराने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

नवनियुक्त संचालक मंडळामध्ये हेमंत रासने, राजेंद्र सूर्यवंशी, राहुल चव्हाण, अमर कोद्रे, बाळकृष्ण सातपुते, नितीन राऊत, राजेंद्र पायमोडे, इंद्रजित रायकर, सुनील जाधव यांसह राखीव विभागातून महिलांमध्ये शोभा गोडसे, आसावरी रायकर आणि पुरुष राखीव गटातून चंद्रकांत मंचे, सुनील माने यांची नियुक्ती झाली आहे. सहकार विभागाकडून शाहूराज हिरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

बँकेचे अध्यक्ष सूर्यवंशी म्हणाले, सुवर्णयुग सहकारी बँकेची स्थापना १९७३ मध्ये झाली. बँकेच्या पुणे जिल्ह्यात २० ठिकाणी शाखा आहेत. बँकेच्या ८५० कोटी रुपयांच्या ठेवी असून, ६५० कोटी रुपयांची कर्जे आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षात बँकेतर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने समाजातील कमकुवत घटकांसाठी व गरिबांसाठी योजना राबविणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT