ब्रह्मास्त्र मानलं जाणाऱ्या प्रियांका फेल झाल्या का? पटोलेंनी दिलं उत्तर

पाचही राज्यांच्या निवडणुकांत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्याचं आपल्याला पहायला मिळालं आहे.
Nana Patole
Nana Patoleटिम ई सकाळ

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या देशातील पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आज अखेर लागले असून पाचपैंकी चार राज्यांत भाजपाने आघाडी घेतली आहे. तर एका राज्यात आपने आपली सत्ता राखली आहे. तसंच कॉंग्रेसचा सर्वच राज्याच दारुण पराभव झालेला आपल्याला पहायला मिळत आहे.

गोवा, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. दरम्यान देशात भाजपाला हरवण्यासाठी अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात आली होती. कॉंग्रेकडून स्थानिक पक्षांसोबत युती करत भाजपाला हरवण्यासाठी योजना आखल्या होत्या पण निकालानंतर त्या योजना फेल ठरल्याचं आपल्याला पहायला मिळालं आहे. तसंच यावेळी प्रचाराची सुत्रे प्रियांका गांधीकडे असल्याचं पहायला मिळालं होतं. या पराभवानंतर महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया माध्यामांसमोर व्यक्त केली आहे.

Nana Patole
पंजाबमधील सरकारी कार्यालयात लागणार आता भगतसिंग अन् आंबेडकरांचा फोटो

ब्रम्हास्त्र मानल्या जाणारा प्रियांका अस्त्र फेल झालाय का? असा प्रश्न विचारल्यावर नाना पटोले यांनी उत्तर देताना म्हटलंय की, "आमची संख्या कमी असतानाही आम्ही जिद्दीने लढलो आणि उत्तरप्रदेशमधील ४०३ जागा लढवल्या." त्यानंतर कॉंग्रेसने आता गांधी घराण्याबाहेरील अध्यक्षांचा विचार करावा का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "कुणीही बाहेरच्यांनी येऊन आमच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करु नयेत. ज्याने त्याने आपापल्या पक्षाचा विचार करावा." असं ते बोलले आहेत.

सगळ्या राज्यातील निकालाचा विचार केला तर कॉंग्रेसने पंजाबमध्ये ११७ पैकी फक्त १८ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. तसेच मणिपूरमध्ये ६० जागांपैकी फक्त ९ जागा, उत्तराखंडमध्ये ७० पैकी १८ जागा, गोव्यात ४० पैकी १२ जागा, आणि उत्तरप्रदेशमध्ये ४०३ जागांपैकी फक्त २ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. एकंदरीत या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव झालेला आपल्याला पहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com