sakal media
पुणे

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ

प्रवेशपत्रात त्रुटी, केंद्र आणि अभ्यासक्रमाबद्दल परिक्षार्थीत संभ्रम

सम्राट कदम -सकाळ वृत्तसेवा

पुणे: आरोग्य विभागातील इलेक्ट्रिशियन पदासाठी मी अर्ज केला असून, येत्या शनिवारी (ता.२५) माझी लेखी परीक्षा आहे. विभागाच्या संकेतस्थळावर बुधवारी दुपारी प्रवेशपत्र आले. त्यात ना माझा फोटो आहे, ना परीक्षा केंद्र. सांगा मी नक्की काय करायला हवं, बारामती राहणार राजेश बडे (नाव बदललं) पोट तिडकीने आपली समस्या सकाळशी बोलत होता. केवळ राजेशच नाही, राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवाराची हीच अवस्था आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. यासाठी शनिवार (ता.२५) आणि रविवार (ता.२६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ आहे. एका खासगी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विकास सिंदाळकर म्हणाले, "राज्यभरात आठ लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले असून, प्रवेश पत्रातील गोंधळामुळे उमेदवारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे."

उमेदवारांच्या अडचणी :

- परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही

- अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही

- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही

- दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य

- संकेतस्थळ अनेकदा हँग होते

आरोग्य विभागातील पदे

१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक... आदी

२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/ स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस... आदी

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ :

संवर्ग : पदांची संख्या : आलेले अर्ज

गट क : २७२५ : ४,०५,०००

गट ड : ३४६६ : ४,६१,०००

"१३ जून २०१८ च्या परिपत्रकानुसार परीक्षेला ५० प्रश्न १०० गुण अस आहे. मात्र त्यामध्ये कोणकोणते विषय असतील, महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी आहे की नाही याविषयी संभ्रम आहे. या परिपत्रकात कोठेही गट ड चा उल्लेख नाही." - मेघदूत हेर्लेकर, परीक्षार्थी

"नाशिक जिल्ह्यातून इलेक्ट्रिशियनआणि ठाणे जिल्ह्यांमधून वाहन चालक या पदासाठी अर्ज केला आहे. प्रवेश पत्रावर एकाच दिवशी या दोन्ही परीक्षा द्यायला सांगितले. आता नक्की काय करावे हा प्रश्न आहे. या दोन्हीसाठी माझा अर्ज आणि प्रवेश शुल्क स्वीकारले गेले." - हेमंत गायकर, परीक्षार्थी, नाशिक

"उमेदवारांचा व्हॉट्सअप संपर्क क्रमांक, ईमेल आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रवेशपत्र उपलब्ध करून देत आहोत. संबंधित कामासाठी न्यासा कंपनी कार्यरत असून, आरोग्य विभागाच्या मार्फतही उमेदवारांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष कक्ष स्थापन करत आहोत. संकेतस्थळावर ईमेलच्या माध्यमातूनही समस्यांचे निराकरण चालू असून, उद्या दुपार पर्यंत उमेदवारांना प्रवेशपत्र मिळेल."- डॉ.नंदकुमार देशमुख, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW Final : स्मृती मानधनाची विश्वविक्रमी खेळी! शफाली वर्मासोबत इतिहास घडवला; भारताच्या 'सुवर्ण'पदकाचा पाया भक्कम

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

SCROLL FOR NEXT