Ganesh Visarjan Esakal
पुणे

Ganesh Visarjan: आधी नाचायला येत होतो पण आज... विसर्जन मिरवणुकीत तृतीयपंथी बंदोबस्तात सज्ज

राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मानाचे गणपती विसर्जित होत आहेत. राज्यभरात मोठी धामधूम सुरू आहे. मिरवणूक आणि विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पुणे शहर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सुरक्षेच्या बंदोबस्तामध्ये काही तृतीयपंथीयांचा देखील समावेश करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पुणे महानगरपालिकेच्यावतीने हा अनोखा उपक्रमक राबवण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेने यंदा या बंदोबस्तामध्ये काही तृतीयपंथीयांचा समावेश केला आहे. गणेश उत्सवात आपली एक सेवा असावी म्हणून तृतीयपंथी यामध्ये उत्साहाने सहभागी झाले आहेत. (Marathi Tajya Batmya)

यावेळी प्रतिक्रिया देताना तृतीयपंथीयांनी सांगितले की, आम्हाला समाजात जो मान नव्हता, तो आता मिळत आहे. आम्हाला हे काम करत असताना आनंद होत आहे. आमचं हे पहिलंच वर्ष आहे. आम्ही याआधी मंडपात नाचायला येत होतो. आज आम्ही भाविकांच्या रक्षणासाठी आलो आहोत. याचा आनंद आम्हाला होत आहे. आम्ही २५ जण आहोत.

तृतीयपंथींना पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेने असे काम दिले आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत असं घडलं नव्हतं ते आज घडलं असल्याचं देखील काही यावेळी म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

दरम्यान पुणे शहरात तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या समिती तयार करून त्याद्वारे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि तृतीयपंथी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण करत जनजागृती करण्यावर भर देत आहेत. भविष्यात तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगितले आहे. (Marathi Tajya Batmya)

काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या मिळकतींचे संरक्षण करण्यासाठी २५ तृतीयपंथीयांना प्रायोगिक तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

दरम्यान पुण्यात गणेश विसर्जनासाठी लक्ष्मी रस्त्यावरील गर्दीवर नजर ठेवण्यासाठी २५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुणे शहरातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या विसर्जन मार्गावर पोलिसांनी नागरिकांसाठी पोलीस मदत केंद्र सुरु केले आहे. नागरिकांना माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फलक बसविण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

IPL 2026 News: मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर CSK च्या ताफ्यात! काल वानखेडेवर होता, आज मोठा ट्विस्ट; रोहितचा आशीर्वाद घेतला अन्...

Latest Marathi News Live Update : इंडिया आघाडीने महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला: अमित शहा

Lucky Plants for Home : कुंडीत लावा 'ही' 2 युनिक झाडे! घराकडे खेचतात पैसा; उघडतात यशाची दारे, पण रोपटं लावताना करू नका एक चूक

SCROLL FOR NEXT