Death of Two Wheeler rider in accident in pune 
पुणे

पुणे : भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे झाला अपघात

सकाळ वृत्तसेवा

उंड्री: वडकीनाला येथे भरधाव पिकअपची जोरदार धडक बसल्याने मोटारसायकलचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे २० फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर पिकअपचालक पळून गेला.

कृष्णा महादेव बिडगर (वय २०, रा. वलवावस्ती, वडकी, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योगेश मोडक (वय २९, रा. वलवावस्ती, वडकी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात पिकअपचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, हडपसर-सासवड रस्त्यावर वडकीनाला (ता. हवेली) येथे रस्ता मोटारसायकलवरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव महिंद्रा पिकअपची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअपचालक पळून गेला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पी. के. हंबीर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

Latest Marathi News Update: ‘मकोका’तील फरार आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

SCROLL FOR NEXT