पुणे महापालिकेला शव दाहिनीसाठी खरेदी करावा लागतोय महागडा गॅस

पुणे महापालिकेच्या स्मशानभूमीतील गॅस दाहिन्यांना थेट 'एमजीएनएल' कडून गॅस पुरवठा करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपासून पडून आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Summary

पुणे महापालिकेच्या स्मशानभूमीतील गॅस दाहिन्यांना थेट 'एमजीएनएल' कडून गॅस पुरवठा करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपासून पडून आहे.

पुणे - पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) स्मशानभूमीतील गॅस दाहिन्यांना (Cremation) थेट 'एमजीएनएल' कडून गॅस पुरवठा (Gas Supply) करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपासून पडून आहे. हा निर्णय होऊन देखील त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे महापालिकेला व्यावसायिक दराचे महागडे १९०० रुपयांना एक सिलिंडर विकत घ्यावे लागत आहेत.

पुणे महापालिकेच्या शहराच्या विविध भागात स्मशानभूमी आहेत. त्या ठिकाणी विद्युत दाहिनी, गॅस दाहिनी, लाकडाचा वापर करून अंत्यसंस्कार केले जातात. प्रदूषण कमी करण्यासाठी गॅस व विद्युत दाहिनीचा वापर केला जातो. महापालिका बाजारातून व्यावसायिक दराचे सिलिंडर विकत घेऊन त्याचा वापर शव दहनासाठी केला जातो. एका शवासाठी सुमारे दीड सिलिंडर म्हणजे सुमारे २९ किलो गॅसची आवश्यकता भासते. सध्या बाजारात या १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १ हजार ९०० रुपये इतकी आहे. गॅसचे दर गगनाला भिडत असताना त्याचा फटका महापालिकेला बसत आहे. तसेच स्मशानभूमीत सिलिंडर उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिकेची धावपळ होत आहे.

Pune Municipal Corporation
पुण्यात जिल्हाधिकार्यालयात काँग्रेस-ओबीसी आंदोलक एकमेकांत भिडले

महापालिकेने दोन वर्षापूर्वीच एमजीएनएलने थेट स्मशानभूमीपर्यंत गॅसची पाइपलाइन टाकून त्याद्वारे चोवीस तास या उपलब्ध करून द्यावा असा प्रस्ताव देण्यात आला. त्यात नायडू स्मशानभूमीतील दोन विद्युत दाहिनी, वैकुंठ स्मशानभूमी, हडपसर, धनकवडी, बिबवेवाडी, मुंढवा, बाणेर, औंध या ठिकाणी प्रत्येकी एक अशा नऊ विद्युत दाहिनींना थेट पाइपलाइन द्वारे गॅस उपलब्ध व्हावा अशी मागणी महापालिकेने केली आहे. मात्र,त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

‘एमजीएनएलकडून गॅस उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पण अद्याप त्यांच्याकडून पाइप लाईन टाकली नाही. सध्या १९०० रुपयांचा व्यावसायिक सिलेंडरचा वापर गॅसदाहिनीसाठी केला जात आहे. पण हे सिलिंडर महाग पडत असल्याने एमजीएनएलने निवासी दराने गॅस उपलब्ध करून द्यावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.’

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

सिलिंडर एक हजाराने वाढला

शव दाहिनीसाठी गेल्यावर्षी सुमारे ९५० रुपयांना १९ किलोचा सिलिंडर मिळत होता. पण गेल्यावर्षभरात याची किंमत वारंवार वाढल्याने हा सिलिंडर आता थेट १९०० रुपयांना मिळत आहे. महापालिकेतर्फे विद्युतदाहिनीत रोज सरासरी १५ शवांचे दहन केले जाते. त्यासाठी किमान रोजचे १९०० रुपये दराने २३ सिलिंडर विकत घ्यावे लागत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com