Pune_University 
पुणे

होस्टेलमधील साहित्य घरी न्यायचंय? मग एक मेल पाठवा अन् साहित्य घेऊन जा!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : "लॉकडाऊनमुळे विद्यीपाठातील वसतीगृह तातडीने सोडावे लागले. पुस्तके, वह्या, नोट्‌स, लॅपटॉप यासह इतर साहित्य खोलीतच राहिले. आता प्रत्यक्षात वर्ग कधी सुरू होणार माहिती नाही, त्यामुळे रेक्‍टरकडे साहित्य हवे असल्याने चौकशी सुरू केली. अखेर विद्यापीठाने यासाठी व्यवस्था निर्माण करून साहित्य घेण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे,'' असे दापूर तालुुक्‍यात राहणारा वैभव खराडे याबद्दल सांगत होता.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मार्च महिन्यात विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले होते. मात्र, पुण्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडायला लागले, त्यामुळे राज्य सरकारने राज्यभरातील शाळा महाविद्यालये बंद केली. १०-१५ दिवसांनी लॉकडाऊन उठेल, पुन्हा विद्यापीठात परत येता येईल या विचाराने बहुुतांश विद्यार्थ्यांनी पुस्तके, नोट्‌स, कपडे, लॅपटॉप यासह इतर साहित्य खोलीतच ठेऊन घरी निघून गेले. विद्यापीठ प्रशासनाने सर्व मुलांचे, मुलींचे वसतीगृह ताब्यात घेऊन सर्वांना कुलूप लावून टाकले.

लॉकडाऊन वाढत चालल्याने अंतिम वर्ष वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्‌द्‌ झाल्या. नवीन शैक्षणिक वर्षात थेट वर्ग कधी सुरू होईल हे माहिती नाही. विद्यापीठाने ऑनलाईन क्‍लास सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पुस्तके, नोट्‌स, लॅपटॉप आवश्‍यक आहेच. तर शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खोली सोडावीच लागणार होती. त्यामुळे वसतिगृहातील वस्तू परत मिळाव्यात यासाठी विद्यार्थ्यांकडून चौकशी सुरू झाली. त्यास विद्यापीठ प्रशानाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत सुमारे ३०० विद्यार्थी साहित्य घेऊन गेले आहेत.

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, "विद्यार्थ्यांनी त्यांचे बरेचशे साहित्य वसतीगृहातील खोलीत ठेवले आहे. त्यांना ते हवे असल्याने आमच्याकडे चौकशी सुरू केली. सोशल डिस्टन्सिंग आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा यास प्राधान्य देऊन यासाठी यंत्रणा उभारली आहे. आत्तापर्यंत ३०० विद्यार्थी साहित्य घेऊन गेले आहेत.

वैभव हा पुणे विद्यापीठात एम.कॉम. प्रथम वर्षात होता. तो म्हणाला, पुणे विद्यापीठाला ई-मेल करून साहित्य घेण्यासाठी वेळ आणि तारीख मागितली आहे. त्यानुसार विद्यापीठात जाणार आहे. माझ्या काही मित्रांनी साहित्य आणले आहे.

अशी आहे पद्धत
ज्या विद्यार्थ्याला साहित्य हवे आहे त्याने नाव, रोल नंबर, विभाग, वर्ग, वर्ष, वसतिगृह क्रमांक, खोली क्रमांक आणि ज्या वस्तू हव्या आहेत, त्याचा तपशील chiefrector@unipune.ac.in यावर ई-मेल करावा, तर विद्यार्थीनींनी lhacr@unipune.ac.in यावर ई-मेल करावा. त्यानंतर विद्यार्थी/विद्यार्थीनीला वसतीगृह भेटीची दिनांक आणि वेळ दिला जातो.

तक्ता
मुलांची वसतीगृहे - ९
क्षमता - १७५०
मुलींची वसतीगृहे - ९
क्षमता - ११५०

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT