डीजे आवाज वाढवणार? साऊंड सिस्टिम असोसिएशनने केली 'ही' मागणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

कोरोनाच्या काळामध्ये साऊंड सिस्टिमचा धंदा गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. सरकारने निर्बंध घातले आहेत, मात्र आम्ही काम केले नाही तर आमचे घर कसे चालणार?

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे या लॉकडाऊनचा आर्थिक फटका व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. लॉकडाऊन काळात उत्सव, लग्नकार्य या समारंभावर सर्व धार्मिक काम, यावर बंदी असल्याने साऊंड सिस्टिम धंदा बंद होता. यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून सरकारने तातडीने यावर लक्ष द्यावे. यासाठी पुण्यात सोमवारी (ता.१०) पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम असोसिएशनने बंदी उठविण्याची मागणी केली आहे.

पुणेकरांच्या आठवड्याची सुरुवात ट्रॅफिक जॅमने; संध्याकाळीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता​

कोरोना आणि लॉकडाउनमुळे साऊंड सिस्टिमचा धंदा गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. सरकारने निर्बंध घातले आहेत, मात्र आम्ही काम केले नाही तर आमचे घर कसे चालणार? सरकारद्वारे इतर व्यवसायांवरील बंदी उठविण्यात आली आहे. मग साऊंड व्यावसायिकांना याचा फायदा का नाही? पुढील काळात गणपती आणि नवरात्र आले आहेत. त्याकरिता सरकार त्यावरील असलेले निर्बंध मागे घेणार का? असे प्रश्न व्यावसायिकानी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडले.

याप्रसंगी छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष करन गायकर, असोसिएशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश काळभोर, उपजिल्हाध्यक्ष अनिल पाटील, सचिव अमोद आमले आदी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District Sound System Association demands lifting of ban