UGC ESAKAL
पुणे

UGC Recruitment : राज्यात लवकरच मोठी प्राध्यापक भरती! भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे यूजीसीचे निर्देश, राज्यांना लिहिले पत्र

Shikshak Bharti : राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त असून, तब्बल बारा वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली आहे.

सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

Pune - विद्यापीठे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचा रिक्त पदांबद्दल खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) नाराजी व्यक्त केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ही रिक्त पदे तातडीने भरा, असे निर्देश युजीसीने दिले आहे. यासंबंधीचे पत्रही राज्यांना पाठविण्यात आले आहे.

राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त असून, तब्बल बारा वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली आहे. वेळोवेळी समाज घटकातील सर्वांनीच प्राध्यापक भरतीकडे लक्ष वेधले होते. मात्र राज्यस्तरावर कोणतीच हालचाल न झाल्याने, थेट युजीसिनेच पुढाकार घेत प्राध्यापक भरतीसाठी राज्यांवर दबाव आणला आहे. युजिसी चे अध्यक्ष प्रा. एम जगदीश कुमार यांनी यासंदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, शिक्षण सचिव आणि राज्यपालांचे सचिव यांना पत्र लिहिले आहे.

प्रा. जगदीश कुमार म्हणाले," उच्च शैक्षणिक संस्था मधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा परिणाम थेट अध्ययन-अध्यापनावर होतो. त्यामुळे तातडीने पात्र आणि सक्षम उमेदवारांची पदे भरली जाणे आवश्यक आहे. राज्याच्या आखत्यारीतील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदे तातडीने भरावी यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरला आहे."

प्राध्यापक भरतीची सद्यस्थिती

  • - राज्यातील सुमारे ६० टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त

  • - मागील बारा वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली

  • - अत्यंत अल्प प्रमाणात निवडक ठिकाणी भरती

  • - महाविद्यालयांवर सीएसबी प्राध्यापकांचा भार

  • - उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कमालीची अनास्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात बंदी असूनही लेझर लाईटचा धुमाकूळ

Nainital Adventure Sports: नैनीझीलच्या लाटांवर रंगणार जलक्रीडेचा थरार; स्विमिंग-कयाकिंगसोबत विंड सर्फिंग अन् डायव्हिंग

Pica Disorder Case: पोटात ६ सुया, हेअर पिन अन् काचेचे तुकडे; गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत महिलेचा जीव वाचला! काय आहे पायका डिसऑर्डर?

Nagpur illegal steroid sale: नागपुरात परवाना नसताना टेस्टोस्टेरॉन औषधांची विक्री; १६.६५ लाखांचा साठा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा

Pune Airport : विमानतळावर ‘ई-बोर्डिंग’ सुविधा; इमिग्रेशनसाठी शिक्का मारण्याची पद्धत आता बंद

SCROLL FOR NEXT