UGC New Norms : चार वर्षांच्या पदवीनंतर आता थेट Ph.D, जाणून घ्या UGC चे नवे नियम

आता विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी मास्टर्स करण्याची गरज भासणार नाही.
UGC
UGCSakal

Ph.D. After 4 Year Graduation : पीएचडी करू इच्छिणाऱ्या परंतु पदव्युत्तर पदवी पूर्ण न केल्यामुळे पीएचडी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसीने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

चार वर्षांच्या बॅचलर अभ्यासक्रमाला असलेले विद्यार्थी आता थेट पीएचडी करू शकणार आहेत. या विद्यार्थांना यासाठी वेगळी पदव्युत्तर पदवी करण्याची गरज भासणार नाही. असेही आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.

UGC
Inflation In India : गगनाला भिडलेल्या महागाईवर लवकर दिलासा; अर्थमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण संकेत

यूजीसी बऱ्याच काळापासून पदवीपूर्व कार्यक्रम पूर्ण करण्याचे मानक आणि पद्धत बदलण्याची तयारी करत होते. त्यासाठी नवा अभ्यासक्रम राबविण्याचा त्यांचा विचार होता. अखेर यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. अलीकडेच, UGC ने चार वर्षांचा कार्यक्रम म्हणून ऑनर्स पदवी अभ्यासक्रम परिभाषित करून, पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी नवीन क्रेडिट आणि अभ्यासक्रम फ्रेमवर्क जाहीर केले होते.

UGC
Viral Video : दारूड्याला चावला विषय संपला; कोब्राच्याच तोंडातून फेस निघाला

तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम बंद होणार नाही

दरम्यान, यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदीश कुमार म्हणाले की, विद्यापीठे तीन ते चार वर्षांच्या कार्यक्रमांची निवड करू शकतात. यासाठी काय शिकवायचे किंवा कोणते अभ्यासक्रम चालवायचे आहेत याचा सर्वस्वी निर्णय विद्यापीठांवर सोडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि गरजा लक्षात घेऊन विद्यापीठे स्वत: याबाबत निर्णय घेऊ शकतात. मात्र, चार वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत तीन वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम बंद केला जाणार नसल्याचे जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com