Computer Sakal
पुणे

पुणे महापालिकेकडून लसीकरणासाठी करणार संगणक खरेदी

फर्निचर व इतर कामांसाठी लाखो रुपयांचा खर्च सुरू असताना आता त्या ठिकाणी नवे संगणक उपलब्ध करून देण्यासाठी ३० लाख रुपयांची निविदा काढली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) फर्निचर व इतर कामांसाठी लाखो रुपयांचा खर्च सुरू असताना आता त्या ठिकाणी नवे संगणक (Computer) उपलब्ध करून देण्यासाठी ३० लाख रुपयांची निविदा (Tender) काढली आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरील शाळांमधील संगणक वापरून लसीकरण केले जात असताना आता यासाठी संगणक खरेदी केली जाणार आहे. (Purchase of Computer for Vaccination from Pune Municipal Corporation)

शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरूवातीला १२१ केंद्र सुरू केली होती. मात्र, तेथे राजकीय वाद सुरू झाल्याने प्रत्येक नगरसेवकाला एक लसीकरण केंद्र सुरू करून देण्यात आले. शहरात सध्या लसीकरण केंद्रांची संख्या १८१ आहे. प्रशासन गरजेनुसार जास्त केंद्र सुरू करत असून शहरात सध्या २०० शासकीय केंद्र आहेत. लसीकरण झालेल्या नागरिकांची नोंदणी ऑनलाइन होत असल्याने प्रत्येक केंद्रावर एक संगणक, इंटरनेट कनेक्शन आणि विजेची व्यवस्था महापालिकेला करावी लागत आहे. या केंद्रांवर सध्या महापालिका व नगरसेवकांच्या माध्यमातून संगणकाची व्यवस्था केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मध्यवर्ती भांडार विभागातर्फे संगणक खरेदीसाठी निविदा काढली असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

एक संगणक ४८ हजारांचा

लसीकरण केंद्रांसाठी ४६ संगणक खरेदी करणार आहेच, पण त्याचसोबत प्रिंटर व युपीएसही खरेदी केले जातील. यामध्ये प्रती संगणकाची किंमत ४८ हजार आणि प्रिंटरची १४ हजार ९९० रुपये इतकी आहे. युपीएसची किंमत २ हजार १०० रुपये इतकी आहे.

लसीकरण केंद्रांसाठी संगणक खरेदीची निविदा काढली आहे. सध्या लसीकरण केंद्रांवर शाळा व इतर विभागातील जुने संगणक वापरले जातात.

- ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख, मध्यवर्ती भांडार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, पोलिसांनी केला पर्दाफाश

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT