पुण्यात काय सुरू, काय बंद? हॉटेल, दुकाने 4 पर्यंतच, मॉल पुन्हा बंद!

Pune Corona Update
Pune Corona Updatesakal media

पुणे: सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी चारपर्यंतच सुरु राहणार; राज्य सरकारच्या निर्देशानुसार शहरात नवी नियमावली लागू झाली असल्याची माहिती आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. राज्य शासनाने काल शुक्रवारी पारित केलेल्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीत लेव्हल ३ चे निर्बंध लागू राहतील. साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये सुधारित आदेश देण्यात आले आहेत.

काय सुरु आणि काय बंद?

१) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.

२) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने ( Non-Essential Shops) सोमवार शुक्रवार दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.

३) मॉल, सिनेमागृह (Single Screen and Multiplex) नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.

४) रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. दुपारी ४.०० नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा (Home Delivery ) रात्री ११.०० पर्यंत सुरु राहील.

५) लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा Airport Services), बंदरे सेवा ( Port Services यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.

६) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ) खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०५.०० ते सकाळी ०९.०० वाजेपर्यंत सुरु राहतील,

(७) सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा ( Exemption Category ) व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ( working days ) ५०% कर्मचारी क्षमतेने दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.

८) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविंड १९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये ( Government Offices and Emergency Services required for Covid-19 Management) १००% क्षमतेने सुरु राहतील.

शासकीय कार्यालये अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त ) ५०% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.

Pune Corona Update
भारताने गाठला चाळीस कोटी चाचण्यांचा टप्पा; ICMR ने दिली माहिती

९) सर्व आउटडोअर स्पोर्ट्स ( outdoor games) सर्व दिवस सकाळी ०५.०० ते ०९.०० या वेळेत सुरु राहतील.

१०) सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार

  • दुपारी ०४.०० वाजपर्यंत परवानगी राहील.

  • उपरोक्त कार्यक्रमाचा कालावधी हा ३ तासांपेक्षा जास्त असू नये

  • सदर ठिकाणी खाद्यपदार्थचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

  • सदर कार्यक्रमात Covid Appropriate Behaviour (CAB) चे पालन करावे. > आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच बारंबार नियमांचा भंग झाल्यास सदर आस्थापनाचे परवाना रद्द करणे अथवा मे. केंद्र शासन कोविड १९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.

११) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सदर ठिकाणी दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील.

१२) लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. मे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळी विवाह संबंधित कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

(१३) अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. मे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळी अंत्यविधीशी संबंधित कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

१४) पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी ०४.०० वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील.

१५) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरू राहतील.

१६) ई कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.

१७) पुणे महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास ( जमावबंदी ) प्रतिबंध राहील तसेच सायंकाळी ०५.०० नंतर ( अत्यावश्यक कारण वगळता ) संचारबंदी लागू राहील.

१८) व्यायामशाळा ( Gym), सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार (by appointment) दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. सदर ठिकाणी वातानुकूल ( A.C) सुविधा वापरता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com