phd
phd  Sakal
पुणे

PHD Degree : पीएचडीच्या व्यवहार्यतेवरच प्रश्नचिन्ह; दर्जा आणि प्रोत्साहनाच्या समन्वयाची गरज

सम्राट कदम

पुणे - ज्ञानाच्या जिज्ञासे ऐवजी पदोन्नतीच्या आमिषापोटी आणि नावापुढे डॉक्टर मिटविण्याच्या नादात पीएच.डी. खरंच व्यवहार्य राहीली आहे का? असा प्रश्न आता शिक्षण तज्ज्ञांनीच उपस्थित केला आहे. देशभरात दरवर्षी हजारो लोकांना पीएच.डी.ची पदवी प्रदान करण्यात येते. मात्र, त्यातील किती प्रबंध उपयोजित आणि मूलभूत ज्ञानात भर पाडतात हा मोठा प्रश्न आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सहाय्यक प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी पीएच.डी.आवश्यक ठरवली आहे. तसेच खासगी विद्यापीठांसह मार्गदर्शकांच्या वाढलेल्या संख्येमुळे पीएच.डी.चा एक मोठा बाजारच मांडला गेला आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञांनी दिली आहे. नुकतेच पीएचडीचा काळाबाजार नावाची एक वृत्त मालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर शैक्षणिक वर्तुळात पीएचडीच्या व्यवहार्यतेवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

वरिष्ठ प्राध्यापक सांगतात, ‘संशोधनाची आवड आणि नवीन ज्ञान निर्मितीची ओढ या दृष्टीने पीएचडीकडे पाहिले जाते. मात्र आज अनेकजण पदव्युत्तर पदवीनंतर नोकरी नाही, म्हणूनही पीएच.डी.ला प्रवेश घेत आहे. उदंड झालेले मार्गदर्शक आणि एकंदरीत नियंत्रणाचा अभाव त्यामुळे सर्वांचेच साटेलोटे चालत आहे. शैक्षणिक वर्तुळातील एक व्यक्ती म्हणून मला प्रश्न पडतोय, आज पीएचडी नावाची पदवी असावी का नाही.’

पीएचडी मार्गदर्शकासाठी नवा नियम -

पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता देऊ नये अशी अधिसूचना यूजीसीने काढली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यासंबंधीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. इतरही विद्यापीठात यासंबंधी निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पीएचडीच्या धोरणात अनेक बदल आता अपेक्षीत आहे. दर्जा सुधारासाठी अशा नियमांची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

म्हणून व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह?

- जवळपास ८० टक्क्यांहून अधिक संशोधने दर्जाहीन

- उपयोजित आणि मूलभूत संशोधनाचा अभाव

- पदोन्नतीसाठी प्राध्यापकांचे पीएचडीला प्राधान्य

- शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्ती मिळविण्यासाठीही पीएचडी

- अनेक प्रबंध हे बाजारू पद्धतीने उपलब्ध होतात

- थोडीफार विद्यापीठे सोडता अनेक ठिकाणी पीएचडीचा अक्षरशः बाजार

संशोधनासाठी आवश्यक सुविधा, निधी मिळायलाच हवा. पण त्यासाठीचे योग्य इन्सेन्टिव्हही हवेच. सगळ्याच गोष्टी स्वान्त सुखाय होत नाही. मात्र, या दोन्हींचीही सांगड घालायला हवी. सगळ्याच्या मुळाशी नीतिमत्ता जोपासणे गरजेचे आहे. आजच्या काळात शिक्षकाकडून अशी अपेक्षा करायची वेळ येणे निराशाजनक आहे.

- डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

संशोधनासाठी जिज्ञासा, स्वयंस्फुर्तता, कल्पकता आणि तार्किक विचारशक्ती हवी. कोणत्याही आमिषाने उपयोजित किंवा मूलभूत संशोधन होऊ शकत नाही. पीएचडीचा प्रकार आज कालबाह्य झाला असून, त्याला फक्त एका पदवीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चांगला संशोधक हा उत्तम अध्यापक असेलच असे नाही.

- डॉ. अरुण अडसूळ, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT