Vasant More News | MNS News Updates 
पुणे

ना'राज' वसंत मोरेंनी सोडला व्हॉट्सअप ग्रुप; पक्षाकडून मुंबईला बोलावणं नाही

सकाळ डिजिटल टीम

पुणे: मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरण मनसेमधील अंतर्गत वादालाच जास्त कारणीभूत ठरल्याचं दिसून येतंय. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात नाराजीनाट्य रंगताना दिसून येत आहे. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सर्वप्रथम माध्यमांसमोर येत यासंदर्भातील आपली भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांनी या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आज मुंबईला बोलावून घेतलंय मात्र, यामध्ये शहराध्यक्ष वसंत मोरेंचाच सहभाग नाहीये. एकूणच, त्यांची ही पक्षावरील नाराजी कायम असल्याचं चित्र दिसून येतंय. याबाबत आता महत्त्वाची घडामोड समोर येतेय. पक्षांतर्गत वादाला वैतागून वसंत मोरेंनी व्हॉट्सॲप ग्रुप सोडल्याची माहिती आहे. (Raj Thackeray)

आज मनसेचे पुण्यातील पदाधिकारी बाबू वागसकर, अनिल शिदोरे, साईनाथ बाबर यांना राज ठाकरेंनी मुंबईत चर्चेसाठी बोलावलं आहे. मात्र, वसंत मोरेंना वगळण्यात आलं आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देणार, अशा चर्चांना उधाण आलं आहे. वसंत मोरेंनी आता विभाग प्रमुख, मनसेचे प्रमुख नेते असलेला व्हॉट्सॲप ग्रुप सोडला आहे. मशिदिवरील भोंग्याच्या निर्णयाला वसंत मोरे यांचा विरोध असल्या कारणाने वसंत मोरे पक्षावर नाराज आहेत. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता पक्ष प्रमुख राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.

नेमकं काय प्रकरण?

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. राज ठाकरेंनी 'यू टर्न' घेतला असा टीकेचा सूर होताच, शिवाय त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला कृती कार्यक्रमही वादग्रस्त ठरला. मशीदीच्या समोर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावा, असे आदेश ठाकरेंनी दिले. यानंतर राज्यात धार्मिक द्वेष वाढीस लागत असल्याचं बोललं जातंय.

मुंबईच्या कुर्ल्यात मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचं म्हटलं. काही ठिकाणचे भोंगे देखील उतरवण्याची तयारी सुरू होती. अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मात्र, पुण्यात काही मनसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं म्हटलं होतं. (Raj Thackeray)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT