remedesivir Injection 
पुणे

पुण्यातील रुग्णांना दिलासा; जिल्ह्याला मिळणार १२ हजारांहून अधिक रेमडिसिव्हीर

रेमडिसिव्हीरचा काळा बाजार सुरूच

सकाळ डिजिटल टीम

पुणे : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना गेल्या दोन दिवसांत मागणीच्या तुलनेत रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा समाधानकारक साठा उपलब्ध झाला आहे. यामध्ये १२००० इंजेक्शनचे डोस असून त्यामुळे पुण्यातील रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील ६२७ खासगी कोविड रुग्णालयांमध्ये १६ हजार २१७ ऑक्सिजनयुक्त आणि आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. त्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाकडून रुग्णालयांना बुधवारी १२ हजार ५१ रेमडिसिव्हीरचा पुरवठा करण्यात आला आहे.

खासगी रुग्णालयांना बेड्सच्या प्रमाणात रेमडिसिव्हीरचा पुरवठा करण्यात येत आहे. आज गुरुवारी (ता.५) जिल्ह्यातील ५५७ रुग्णालयांमधील १३ हजार ८०५ बेड॒सच्या तुलनेत ९ हजार ७५६ रेमडिसिव्हीर इंजक्शन उपलब्ध झाले आहेत. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार गरजू रुग्णांसाठी या इंजेक्शनचा वापर करावा. तसेच, रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाइकांना या इंजेक्शनसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ नये, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.

रेमडीसिव्हिरचा काळा बाजार सुरूच

भरारी पथकांमार्फत रुग्णालय स्टॉकिस्ट आणि वितरकांकडील रेमडिसिव्हीर आणि त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. परंतू, त्याचा काळा बाजार सुरूच असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे भरारी पथकांकडून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील रेमडीसिव्हिरचा पुरवठा (चार आणि पाच एप्रिल) :

खासगी रुग्णालये : ६२७

ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्स : १६ हजार २१७

रेमडीसिव्हिर उपलब्ध : १२ हजार ५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

Pandharpur VIP Darshan : पहिल्याच दिवशी VIP दर्शन बंदीचा फज्जा! मुनगंटीवारांना ठेवलं वेटिंगवर, गुलाबराव पाटलांना दिलं तात्काळ दर्शन; महायुतीच्या नेत्यांमध्येच दुजाभाव?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन घेतल्यास गुन्हा दाखल करणार

डॉक्टर पतीला संपवलं, ८ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात; शेजारी डॉक्टर पत्नी मोबाईल बघत बसलेली

'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला' उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT