esakal | कोरोनातून सावरलेल्या काहींना बुरशीजन्य आजार; इंजेक्शनसाठी पुन्हा धावपळ

बोलून बातमी शोधा

कोरोनातून सावरलेल्या काहींना बुरशीजन्य आजार; इंजेक्शनसाठी पुन्हा धावपळ
कोरोनातून सावरलेल्या काहींना बुरशीजन्य आजार; इंजेक्शनसाठी पुन्हा धावपळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रेमडेसिव्हिरनंतर आता ‘म्युकोरमायकॉसिस’ या अत्यंत दुर्मिळ बुरशीजन्य आजारावरील इंजेक्शनसाठी नातेवाइकांची धावपळ सुरू झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांवर हा आजार झडप घालत असल्याचे निरीक्षण शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.


‘म्युकोरमायकॉसिस’ हा अत्यंत दुर्मिळ बुरशीजन्य आजार आहे. शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती कमी झाल्याने हा आजार डोके वर काढतो. कर्करोगाच्या बहुतांश रुग्णांमध्ये हा आजार आतापर्यंत आढळून येत होता. पण, आता कोरोनातून बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये हा प्रकर्षाने दिसत आहे. ‘म्युकोरमायकॉसिस’च्या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे. शहरातील एकेका डोळ्यांच्या आणि कान-नाक-घशाच्या तज्ज्ञांकडे दररोज या आजाराच्या दोन ते तीन नवीन रुग्णांची भरती पडत आहे. त्यामुळे या बुरशीजन्य आजाराच्या इंजेक्शनची मागणी गेल्या आठवड्यापासून वेगाने वाढली. त्याचा थेट परिणाम आता या आजाराच्या इंजेक्शनचा तुटवडा झाला आहे. एक महिन्यापूर्वी रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी शहरातील औषध वितरकांच्या दुकानाचे उंबरे झिजवणारे नातेवाईक आता पुन्हा ‘म्युकोरमायकॉसिस’च्या इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहे. मात्र, त्यानंतरही इंजेक्शनची एकही वायल मिळली नाही. त्याचा थेट परिणाम म्हणजे रुग्णाचा मंगळवारच्या इंजेक्शनचा डोस चुकण्यात झाला.

हेही वाचा: पुण्यात रेमेडिसिव्हिरविना ९१ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

''आईला कोरोनाबाधित असताना रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागली होती. त्यातून बरे होतो न होतो तोच आठवड्याभरात आईच्या उजव्या गालाला, डोळ्याला सूज आली. तिचा ‘एमआरआय’ केल्यानंतर ‘म्युकोरमायकॉसिस’ झाल्याचे निदान झाले. रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले. आता या आजाराच्या इंजेक्शन रुग्णालयातील औषध दुकानांमध्येही मिळत नाही. मंगळवारी एकही इंजेक्शन मिळाले नाही. त्यामुळे आजच्या दिवसाचा डोस चुकला.''
- उमेश तातुस्कर, रुग्णाचे नातेवाईक

''शहरात बुरशीविरोधी इंजेक्शनची मागणी वाढत आहे. एकेका रुग्णाला दहा ते बारा इंजेक्शन एका दिवशी एका वेळी द्यावी लागतात. त्यामुळे आता ही मागणी दोन ते तीन हजार इंजेक्शनपर्यंत वाढली आहे.''
- रोहित करपे, खजिनदार, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट

हेही वाचा: ''राज्य सरकारचे अपयश; मराठा समाजाची केली फसवणूक''

तज्ज्ञांची निरीक्षणे
- ‘म्युकोरमायकॉसिस’ हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील नवीन दुष्परिणाम
- याची सुरवात नाकातून होते
- त्यानंतर डोळ्यातून हा आजार (बुरशी) मेंदूकडे सरकतो
- काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून बुरशी काढली जाते
- त्यानंतर बुरशीविरोधी रामबाण औषधांचा वापर उपचारात केला जातो
- कोरोनातून बरे झालेल्या नेमक्या कोणत्या रुग्णाला हा ‘म्युकोरमायकॉसिस’ होईल, हे निश्चित सांगता येत नाही
- मधुमेह असलेल्या किंवा स्टिरॉईसड्समुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना होण्याची शक्यता

हेही वाचा: मराठा आरक्षण रद्द! पुण्यात आंदोलकांना घेतलं ताब्यात

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा