पुणे

पुणे : 'आयटीआय' परीक्षेचे निकाल रखडले अन् नोकरी...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सुमारे तीन महिने उलटूनही शहरातील मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) वार्षिक परीक्षांचे अधिकृत निकाल अद्याप जाहीर झाले नाहीत. त्यामुळे, वर्षभराचे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करुन संस्थेबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. उत्तीर्ण झाल्याच्या प्रमाणपत्राशिवाय त्यांना नोकरी मिळणे अवघड झाले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मोरवाडी येथे मुलांसाठी तर कासारवाडी येथे मुलींसाठी आयटीआय संस्था चालविली जाते. मोरवाडीमध्ये मुलांना वेल्डर, पेंटर जनरल, शिल्ड मेटल वर्क्‍स, ड्राफ्टस्‌मन मेकॅनिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स मेकॅनिक आदी एकूण 14 प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तर कासारवाडी येथे कॉम्प्युटर ऑपरेटिंग ऍन्ड प्रोग्रॅम असिस्टंट, डीटीपी, बेसिक कॉस्मेटॉलॉजी, हॉस्पिटल हाऊस किपिंग, इलेक्‍ट्रॉनिक्‍स मेकॅनिक आणि फॅशन डिझायनिंग असे सहा प्रशिक्षण अभ्यासक्रम चालविले जातात.

केंद्र सरकारकडून मागील 2018-19 वर्षापासून वार्षिक परीक्षा घेऊन त्यांचे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तेव्हापासून, परीक्षेचे निकालच जाहीर झालेले नाहीत. 

मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी त्याला दुजोरा दिला. पाटील म्हणाले, "केंद्रीय कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार मंत्रालयाअंतर्गत नवी दिल्ली येथील महासंचालक, प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून देशभरातील आयटीआय संस्थांचे निकाल जाहीर केले जातात. मात्र, मागील 2018-19 चे निकाल जाहीर होणे बाकी आहे. हे निकाल सप्टेंबर किंवा ऑक्‍टोबरपर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे.'' 

"जून महिन्यात टर्नर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाची मी परीक्षा दिली. परंतु, अजून त्याचे निकाल जाहीर झालेले नाहीत. सध्या मी द्वितीय वर्षात शिकत आहे. मात्र, आम्हाला प्रमाणपत्र मिळणे फार महत्वाचे आहे. त्याशिवाय, काम मिळणे अवघड ठरते.''

- नारायण देवकुळे, प्रशिक्षणार्थी, 

विभागीय कार्यालयाकडून होणार निकाल जाहीर ! 

काही विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेचे निकाल वेबसाईटवर जाहीर झाल्याचे म्हटले आहे. तर काही विद्यार्थिनींना निकाल पुढील आठवड्यात जाहीर होईल, असे कळविण्यात आले आहे. पुण्यातील घोले रोड येथील व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआय परीक्षेचे निकाल कळविले जाणार आहेत. त्यांच्यामार्फत मोरवाडी, कासारवाडी आयटीआयला हे निकाल पाठविल्यावर ते अधिकृतरित्या जाहीर केले जाणार आहेत. 

आकडेवारीवर दृष्टीक्षेप

- मोरवाडी आयटीआय - 14 प्रशिक्षण अभ्यासक्रम, त्यापैकी, 10 अभ्यासक्रम 2 वर्षांचे, एकूण विद्यार्थी संख्या 450. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी वर्षभराच्या अभ्यासक्रमाची परीक्षा दिली आहे. 

- कासारवाडी आयटीआय - 6 प्रशिक्षण अभ्यासक्रम, इलेक्‍ट्रॉनिक्‍स मेकॅनिक्‍स वगळता इतर वर्षभराचे अभ्यासक्रम, एकूण विद्यार्थिनी संख्या - 120. त्यातील सुमारे 85 विद्यार्थिनींनी वर्षभराच्या अभ्यासक्रमाची परीक्षा दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT