Video : इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला; कासीम सुलेमानींच्या हत्येचा घेतला बदला

वृत्तसंस्था
बुधवार, 8 जानेवारी 2020

इराणच्या सैन्याकडून आज (ता. 8) पहाटे इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले आहेत.

बगदाद : इराणच्या सैन्याकडून आज (ता. 8) पहाटे साडेपाचच्या दरम्यान इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. तब्बल डझनभरहून जास्त बॅलेस्टीक मिसाईलने अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनकडून स्पष्ट करण्यात आली आहे. इराणचे कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला म्हणून इराणने हा हल्ला केल्याचे इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने सांगितले.

Baghdad Airstrike : ट्रम्प यांनी प्लॅन करत केला इराणच्या कमांडरचा खात्मा

इराकमधील इरबिल, अल् असद या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हा हल्ला झाल्याची माहितकी अमेरिकेने दिली आहेत. या हल्ल्यात कोणी मृत्युमुखी झाले आहे का याबाबत अजून कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. इराणने हा हल्ला स्वसंरक्षणासाठी व देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी केला. युएनच्या आर्टीकल 15 नुसारच हा हल्ला करण्यात आला. आम्हाला युद्ध पुकारायचे नाही, पण आम्हाला स्वसंरक्षणाची गरज असल्याचे, इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद जरीफ यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या हवाई दलाला इराण, इराक व आखाती देशांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेच ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हणले आहे की, 'इराणने अमेरिकेच्या दोन सैन्य तळांवर मिसाईल हल्ला केला आहे. आम्ही सर्वशक्तीमान व शक्तिशाली आहेत. जगात कोणापेक्षाही ताकदवान लष्कर आमच्याकडे आहे. यावर उद्या सकाळी आम्ही बोलू.' या ट्विटमुळे आता या दोन देशांमधील तणाव आणखी वाढतो की पुढे काय होणार याकडे जगाचे लक्ष लागेल आहे. 

सुलेमानींच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, तब्बल 35 जणांचा मृत्यू; तर...

 

3 जानेवारीला अमेरिकेने इराणची राजधानी असलेल्या बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमातळावर केलेल्या हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी ठार झाले होते. कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानताळाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी अमेरिकेकडून हा हवाई हल्ला करण्यात आला होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran attacks US military bases targeted with ballistic missiles at Iraq