rickshaw theft by thief on threatened by koyta 
पुणे

कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी पळविली रिक्षा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : काम उरकून घरी जाणाऱ्या रिक्षाचालकास तिघांनी अडवून कोयत्याचा धाक दाखवित त्याच्याकडील रोख रकमेसह रिक्षा चोरुन नेली. ही घटना मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता लष्कर परिसरातील सोलापुर बाजार भागात घडली. 

याप्रकरणी लतिफ काझी (वय 25, रा. साईबाबा नगर, कोंढवा) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी काझी हे रिक्षाचालक आहेत.

कोण आहेत न्या. मुरलीधर? ज्यांची रातोरात बदली झाली?

मंगळवारी काम उरकल्यानंतर ते रात्री सोलापुर बाजार येथून त्यांची रिक्षा घेऊन जात होते. त्यावेळी त्यांना तिघांनी अडविले. त्यांना शिवीगाळ करीत जबरदस्तीने त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यास काझी यांनी विरोध केल्यानंतर त्यांना रिक्षातुन बाहेर ओढून कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम व रिक्षा चोरट्यांनी चोरुन नेली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एम.व्ही. राऊत करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT