कोण आहेत न्या. मुरलीधर? ज्यांची रातोरात बदली झाली?

who is Justice Dr. S Muralidhar
who is Justice Dr. S Muralidhar

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. एस. मुरलीधर यांच्या रातोरात झालेल्या बदलीने दिल्लीतील राजकारण ढवळून निघाले आहे. आपल्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक खटल्यांची सुनावणी करणारे व निकाल देणारे न्या. मुरलीधर एक तर्ककठोर न्यायाधीश म्हणून न्यायवर्तुळात प्रसिद्ध आहेत. न्या. मुरलीधर यांची बदली करण्याच्या कॉलेजियमच्या शिफारसीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाच्या वकिलांनी 20 फेब्रुवारी रोजी जोरदार आंदोलन केले होते.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक निकालांवर नजर टाकली तर त्यांची व वर्तमान सरकारची ‘प्रकृती’ संपूर्ण परस्परविरोधी असल्याचे स्पष्ट दिसते. काल दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या न्या. मुरलीधर यांच्या तडकाफडकी बदलीचा घटनाक्रमच संशयास्पद असल्याचे विरोधकांना ठामपणे वाटते, तर ही नियमित चालणारी प्रक्रिया असल्याची सारवासारव सरकारकडून करण्यात आली आहे.

सरकारने जबाबदारी सुनिश्चित करावी; आरएसएसचा केंद्र सरकारवर निषाणा

- न्या. मुरलीधर यांनी 1984 मध्ये चेन्नईमध्ये वकिलीला सुरुवात केली.
- 1987 मध्ये दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात.
- सर्वोच्च न्यायालयाच्या लीगल सर्व्हिस समितीचे दोनदा सदस्य.
- भोपाळ गॅस दुर्घटना व नर्मदा धरण पीडितांचा खटला त्यांनी एक पैसाही फी न घेता लढविला.
- त्यांचे काही ऐतिहासिक निकाल ः - नाझ फाउंडेशनच्या याचिकेवर 2009 मध्ये समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून हटविण्याचा ऐतिहासिक निकाल देणाऱ्या पीठाचे न्या. मुरलीधर हे सदस्य होते.
- इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत कॉंग्रेस नेता सज्जनकुमार याला 2018 मध्ये त्यांनी दोषी ठरविले होते.
- 2018 मध्येच त्यांनी दिलेल्या आणखी एका निकालात शहरी नक्षलवादाच्या आरोपावरून सरकारने धरपकड केलेले कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यासह अनेकांना त्यांनीच जामीन दिला होता.
- 1987 मधील हाशीमपुरा नरसंहाराबद्दल उत्तर प्रदेशच्या 17 पोलिसांना त्यांनी व न्या. विनोद गोयल यांच्या पीठाने दोषी ठरविले होते.
- दिल्लीत सरकारी जमिनींवरील खासगी शाळांच्या फीवाढीला त्यांनीच गतवर्षी चाप लावला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com