मोशी - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेली गर्दी. 
पुणे

‘आरटीओ’त परवान्याची कामे खोळंबली

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - मोशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे, त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. काही लिपिक नसल्यामुळे आठवडाभर वाहन चालविण्याचे परवाने मिळत नाहीत, अशा तक्रारी आहेत. 

या कार्यालयात रोज सरासरी १२० ते १६० वाहनांची नोंदणी होते. या गाड्यांची पासिंग, परवाने, चेकिंग तसेच विविध कामे सहायक मोटार वाहन निरीक्षक करतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. खिडकी क्रमांक पाचवर दररोज गर्दी असते. तेथील लिपिक सुटीवर गेल्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीत आणखीच भर पडली आहे. त्यांच्या गैरहजेरीत अन्य कर्मचाऱ्यांनी काम करणे अपेक्षित असते; परंतु प्रत्यक्षात ‘तेथील कर्मचारी सुटीवर आहेत. त्यांच्याकडेच तुमची कागदपत्रे आहेत. उद्या या,’ अशी उत्तरे नागरिकांना ऐकायला मिळतात. शहराबरोबरच आंबेगाव, नारायणगावावरूनही लोक कामानिमित्त येतात. त्यांनाही रिकाम्या हाताने परतावे लागले. ‘एनओसी’ देणारा लिपिक अनुपस्थित असल्यामुळे रिक्षाचालकांना त्रास होत असल्याची तक्रार रिक्षा संघटनेचे नेते बापू भावे यांनी केली. येथे एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, एक सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्यासह २८ जण कार्यरत आहेत.

नागरिकांची कामे वेळेत होणे आवश्‍यक आहे. कोणाचीही गैरसोय व्हायला नको. उपलब्ध कर्मचाऱ्यांनी कामे करणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात मी कर्मचाऱ्यांशी बोलेन.
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT