वडगाव निंबाळकर (ता. बारामती) - संत सोपानदेवांच्या पालखीच्या दर्शनासाठी झालेली नागरिकांची गर्दी. 
पुणे

#SaathChal सोपानदेवांच्या पालखीचे वडगावात स्वागत

सकाळवृत्तसेवा

वडगाव निंबाळकर - संत सोपानदेव पालखीचे नीरा-बारामती मार्गावरील वडगाव निंबाळकर, होळ, कोऱ्हाळे बुद्रुक गावांत उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती.

सोरटेवाडी येथे शनिवारी सकाळी झालेल्या पादुका पूजनानंतर पालखी सोहळा होळ आठफाटा येथे आला. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ गिते, संतोष होळकर, बच्चन आटोळे, उत्तम होळकर, आबाजी वायाळ, पंडितराव होळकर, एल. के. होळकर, पालखीच्या स्वागतासाठी होते. दहा फाटा येथील आनंद विद्यालयाजवळ पालखीने विसावा घेतला. या वेळी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक अनंतकुमार होळकर, सरपंच विलासराव होळकर, प्रमोदकुमार गिते, बाळासाहेब होळकर, बापूराव सूर्यवंशी, विजयकुमार लिंबरकर यांनी स्वागत केले. चोपडज, वाकी, सस्तेवाडी, सदोबाचीवाडी परिसरातील नागरिकांनी दर्शन घेतले. वडगाव निंबाळकर येथे सावता माळी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच सुनील ढोले, जीवन बनकर, दत्तात्रेय गिरमे, दत्ता बनकर यांनी स्वागत केले. कोऱ्हाळे बुद्रूकच्या सीमेवर पेशवे वस्तीवर ग्रामस्थांनी फटाके वाजवून स्वागत केले. 

पंचायत समिती सदस्य बापूराव धापटे, सरपंच शैला भगत, उपसरपंच शारदा कदम, भाग्यवान चव्हाण, गुलाब कचरे, बजाबापू माळशिकारे उपस्थित होते.

नगर प्रदक्षिणा करून पालखी सिद्धेश्वर मंदिरात मुक्कामासाठी थांबली. ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. कोऱ्हाळे बुद्रुक येथून पालखी रविवारी (ता. १५) सकाळी माळेगाव शिवनगरकडे मार्गस्थ झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT