sakal Auto Expo 2024
sakal Auto Expo 2024 sakal
पुणे

Auto Expo 2024 : मनपसंत कार अन् बाईक निवडा; सकाळ ऑटो एक्स्पो उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आपल्या स्वप्नातील गाडी घरी यावी, असे प्रत्येकालाच वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवार (ता. १६) व रविवारी (ता. १७) भव्य ‘सकाळ ऑटो एक्स्पो २०२४’ आयोजित केला आहे.

कार किंवा बाईक घ्यायची म्हटल्यावर ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत फिरावे लागते; पण या सर्व प्रश्नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात.

तेव्हा खऱ्या अर्थाने गाडी घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. याचाच विचार करून ‘सकाळ’ने दोन दिवसांचा ऑटो एक्स्पो आयोजित केला आहे. याठिकाणी विविध कंपन्यांच्या कार आणि बाईक, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या किमती आदींची माहिती मिळणार आहे. शिवाय एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलचेही असंख्य पर्याय असतील.

कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फॉर्म येथे दोन दिवसांचा ऑटो एक्स्पो होणार आहे. बजेट कार, सेडान कार, हॅचबॅक कार, एसयूव्ही, स्पोर्ट, इलेक्ट्रिक कार, ईव्ही बाईक आदी गाड्यांची माहिती मिळेल. नव्याने लाँच झालेल्या अनेक गाड्याही येथे पाहायला मिळतील. वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठ्याचे अनेक पर्यायही एक्स्पोमध्ये उपलब्ध आहेत.

एक्स्पोविषयी...

  • कधी : शनिवार (ता. १६) व रविवार (ता. १७)

  • कुठे : पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर

  • केव्हा : सकाळी ११ ते रात्री आठ

  • स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : ९३२५१०६६२६

  • प्रवेश व पार्किंग मोफत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT