NCP Political Crisis Esakal
पुणे

NCP Political Crisis: आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाचा मोठा निर्णय! कार्यालयावरील घड्याळ चिन्ह आणि 'राष्ट्रवादी काँग्रेस' नाव...

NCP Political Crisis:निवडणूक आयोगाने घड्याळ हे पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्षाचे नाव अजित पवार गटाला दिलं आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह काढण्यात आलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह हटवण्यात आलं आहे. काल(मंगळवारी) निवडणूक आयोगाने घड्याळ हे पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्षाचे नाव अजित पवार गटाला दिलं आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह हटवलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शरद पवार गटाने त्यांच्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह हटवलं आहे, त्यामुळे आता पुण्यातील हे ऑफीस शरद पवार गटाचं आधिकृत ऑफीस झालं आहे. आज शरद पवार गटाने काही नवीन नावे आणि पक्ष चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवारांना 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' असं नवं नाव दिलं आहे.

पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह काढले आहे. '२४ वर्ष आमचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस नावाने रजिस्टर होता. NCP हे नाव आम्ही वापरत होतो ते नाव आज खऱ्या अर्थाने मिळालं. शरद पवारांचं नाव यात आहे. आम्ही यामुळे समाधानी आहोत', असं यावेळी प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. तर कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या नावाने घोषणा दिल्या आहेत.

त्याचबरोबर पक्षाचे नाव हे काळ्या कापडाने झाकण्यात आले आहे. यावेळी पुण्याच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमले होते. त्यांनी शरद पवार यांच्या नावाच्या घोषणा दिल्या आहेत. त्याचबरोबर हे नाव काळ्या कापडाने झाकल्यानंतर आणि घड्याळ चिन्ह काढल्यानंतर कार्यकर्ते भावूक झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Petrol Price Hike: पाकिस्तानात 2 दिवसांपूर्वी पेट्रोल स्वस्त, आज मोठी दरवाढ! भारतातही पेट्रोल-डिझेल महागणार?

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : प्रियांका गांधी वाड्रा दिल्लीतील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचल्या

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT