Shirur Lok Sabha 2024 Esakal
पुणे

Shirur Lok Sabha 2024: शिरूरमध्ये जुन्याच मल्लांमध्ये कुस्ती? कोण देणार धोबीपछाड; राजकीय गणित घ्या समजून, लोकसभेची तथ्यचित्रे

Shirur Lok Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर आढळराव पाटलांनी येत्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

Shirur Lok Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली असली; तरी त्यांच्याविरोधात कोण उतरणार, याची उत्सुकता कायम आहे. मात्र, त्यांचे मागील वेळेचे विरोधक व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश व उमेदवारीची चर्चा सुरू आहे. आयात उमेदवारापेक्षा निष्ठावंताला संधी देण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस मधील इच्छुक माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.

मात्र, शिरुर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेणार आहेत. शिरुर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांचं नाव आघाडीवर होते. त्यात महायुतीत ही जागा अजित पवारांच्या गटाला देण्यात आलीय. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती. त्याला दुजोरा मिळाला आहे. आढळराव पाटलांनी येत्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगितलं आहे.

२०१९चे चित्र

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी मते : ६३५८३०

शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) मते : ५७७३४४

राहुल ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) मते : ३८०७०

जमीरखान कागदी (बहुजन समाज पक्ष) मते : ७२४७

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : ५८,४८६

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : राष्ट्रवादी

सद्य:स्थिती

भाजपने धक्कातंत्राचा वापर केल्यास एखादा दिग्गज ‘नटसम्राट’ रिंगणात उतरणार.

खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते हे आढळराव पाटील यांना साथ देणार का?

हे मुद्दे प्रभावी ठरणार

पुणे- नगर व पुणे- नाशिक रस्त्यावरील सततची वाहतूक कोंडी

रांजणगाव, चाकण एमआयडीसीतील घटत चाललेला रोजगार आणि ठेकेदारीचा वाद

कुकडी प्रकल्पातील पाण्याचे वाटप. डिंभे बोगद्याला विरोध.

चासकमान कालव्याची गळती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT