Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024: आदिवासी, ओबीसी ठरणार गेमचेंजर? भाजपला ही निवडणूक यंदा जड जाण्याची शक्यता, लोकसभेची तथ्यचित्रे

Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024: गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल असला तरी ओबीसींची संख्याही मोठीच आहे. रखडलेल्या विकासावरून आदिवासी नाराज आहेत, तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी संतप्त आहेत.
Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024
Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024Esakal

Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर हे सहा विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहेत. गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल असला तरी ओबीसींची संख्याही मोठीच आहे. रखडलेल्या विकासावरून आदिवासी नाराज आहेत, तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी संतप्त आहेत. त्यामुळे येथे भाजपला ही निवडणूक यंदा जड जाण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.

२०१९चे चित्र

अशोक नेते (भाजप) विजयी

मते : ५,१९,९६८

डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस)

मते : ४,४२,४४२

डॉ. रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी)

मते : १,११,४६८

हरीश्चंद्र मंगाम (बहुजन समाज पक्ष)

मते : २८,४०१

विजयी उमेदवारांचे मताधिक्य: ७७,५२६

Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024
Thane Lok Sabha: शिंदेंच्या अस्तित्त्वाची लढाई, ठाण्यात हा मुद्दा गाजणार! लोकसभेची तथ्यचित्रे

वर्चस्व

२००४ : ----

२००९ : काँग्रेस

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

भाजप आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर नाही

भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते यांचे नाव आघाडीवर, पण संघाकडून नवोदित डॉ. मिलिंद नरोटेंसाठी आग्रह

धर्मरावबाबा आत्राम यांचीही उमेदवारीसाठी धडपड.

महाविकास आघाडीकडून राज्यातून डॉ. नामदेव किरसान, तर केंद्राच्या पक्षश्रेष्ठींकडून डॉ. नामदेव उसेंडींना पसंती असल्याची चर्चा

Gadchiroli-Chimur Lok Sabha 2024
Satara Lok Sabha 2024: लढत दोन्ही ‘राष्ट्रवादी’तच? तीन मतदारसंघ ठरवतात साताऱ्याचं भवितव्य! लोकसभेची तथ्यचित्रे

हे प्रभावी मुद्दे

मतदारसंघातील रखडलेले सिंचन प्रकल्प आणि अन्य विकास कामे

संथगतीने चालणारा वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग

धानाला योग्य भाव, वनपट्टे

वैद्यकीय महाविद्यालय

खराब रस्त्यांचा गंभीर प्रश्‍न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com