shiv sena Sushma Andhare her security claimed her life is in danger  
पुणे

Sushma Andhare: माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

सकाळ डिजिटल टीम

पुणे : उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात ठाकेर गटाची बाजू भक्कमपणे लावून धरणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या विधानमुळे सध्या खळबळ उडाली आहे. त्यांच्या विधानामुळे अंधारे यांच्या जीवाला धोका आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांना पोलिसांनी बाहेर पडू नका असे सांगितल्याचे म्हटले आहे.

सुषमा अंधारे सांगितले की, माझी पाच वर्षाची लेक आहे, मला कालपासून काही थ्रेट जाणवतायत, काही इनपुट्स आलेत, ज्यामध्ये कळलं की बाहेर पडू नका, कोणी हल्ला करेल धक्काबुक्की करेल. विश्रांतवाडी पोलिस स्टोशनचे लोक, लोहगाव पोलिस स्टेशन कडून फोन आले की तुम्ही सुरक्षित आहात का? मला कळलं नाही की काय चाललंय, नंतर लक्षात आलं की त्यांच्याकडे काही इनपुट्स आहेत.

अंधारे म्हणाल्या की, मला काय चिंता आहे की माझ्याकडे पाच वर्षाचं बाळ आहे, म्हणून मी जाहीर सांगितलं की मी शिवसेनेला माझं बाळ दत्तक दिलं जेवढे शिवसैनिक आहेत ते मामा म्हणून बाळाला सांभाळतील, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील असे अंधारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा सामना होणार रद्द? चिंता वाढवणारे अपडेट्स, मालिका बरोबरीत सुटणार?

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार, थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा पार

Navratri Day Six: आज नवरात्रीची सहावी माळ! देवी कात्यायनीची पूजा कशी करावी? जाणून घ्या मंत्र, नैवेद्य आणि पौराणिक कथा

Supreme Court: सुनावणी सुरु असताना CJI सूर्यकांत यांच्यासमोरच न्यायालयात राडा! वकिलाचा मायक्रोफोन हिसकावला, चालू प्रकरणातून वकिलाची माघार

SCROLL FOR NEXT