Sidhu Moose Wala massacre Sourav Mahakala arrested in Pune Sidhu Moose Wala massacre Sourav Mahakala arrested in Pune
पुणे

सिद्धू मुसेवाला हत्याकांड : पुण्यातील सौरव महाकाळला अटक

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पंजाबी गायक व काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर आठ शार्पशूटर्सनी गोळीबार केला होता. या हत्याकांडात महाराष्ट्राचे कनेक्शन असल्याचे दोन दिवसांपूर्वी पुढे आले होते. पुण्यातील दोन गुंडांचा या हत्याकांडाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सौरव महाकाळ याला अटक (arrested) केली आहे. (Sidhu Moose Wala massacre Sourav Mahakala arrested in Pune)

सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आठ शार्पशूटरपैकी तीन पंजाबचे असल्याचे सांगण्यात येत होते. याशिवाय हरयाणा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन आणि राजस्थानमधील एक आहे. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी हरयाणातून मारेकऱ्यांना अटक (arrested) केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत हरयाणातील तीन जणांना पोलिसांनी पकडले आहे.

बुधवारी (ता. ८) सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) खून (Murder) प्रकरणातील पुण्यातील आरोपी सौरव महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचे महाराष्ट्र कनेक्शन दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. हत्याकांडातील दोन मारेकरी पुण्यातील असल्याचे बोलले जात होते. यातील सौरव महाकाळला आज अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

फसवून लाटलेली जागा-जमीन मिळते परत! ३ वर्षांच्या आत द्यावी लागते तक्रार; फसलेल्याने वकिलांमार्फत ‘येथे’ करावा अर्ज, ‘या’ ६ बाबी लक्षात ठेवाच...

SCROLL FOR NEXT