crime news india A youth commit suicide because he did not get job unemployment  sakal
पुणे

गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या; घटनेनं खळबळ

अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता.

अक्षय बडवे

पुणे : सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरच्या (Ketaki Mategaonkar) चुलत भावाने केली आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षय अमोल माटेगावकर (Akshay Mategaonkar ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नोकरी न मिळण्याच्या भीतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याचे अक्षयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत त्याने नमूद केले आहे. या घटनेनंतर सुसगाव परिसरात खळबळ उडाली आहे. (Ketaki Mategaonkar Cousin Brother News )

अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता. त्याने एका आयटी कंपनीत इंटर्नशिप केली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी त्याने अर्जही केले होते. मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. या भीतीमुळे त्याने आत्महत्या केली असा उल्लेख त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत काम करतात. या घटनेनंतर माटेगावकर कुंटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News : ​मोदी सरकार​ची चीन​पुढे शरणागती; काँग्रेसचा घणाघात

Shrigonda politics: शिवसेनेच्या पाच जणांची स्वतंत्र गटनोंदणी?; श्रीगोंदेत शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर!

Sangamner Crime: संगमनेरात अवैध वाळू उपशावर कारवाई; ६० लाख १७ हजार रुपयांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

Sangli Married Woman : महिला पुलावरून उडी मारत होती पण कोणी काहीच करू शकलं नाही, सांगलीच्या विवाहितेने कृष्णा नदीत घेतली उडी; कारण काय...

India Open 2026 : संकुलातील परिसर अस्वच्छ अन् सुमार; दिल्लीतील इंडिया ओपन स्पर्धेदरम्यान डेन्मार्कच्या खेळाडूची टीका

SCROLL FOR NEXT